The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे ती ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटात अशा काही महिलांती कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांचे मुस्लीम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते. या चित्रपटात केरळमधील तब्बल 32 हजार महिलांनी कथितपणे इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांना कशा प्रमाणे दहशतवादी संघटनेमध्ये भरती केल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांना खूप मोठा धक्का बसला होता की भारताच्या मुलींसोबत असं काही झालं आहे, ज्याविषयी त्यांना इतके दिवस माहितही नव्हते. दरम्यान, या चित्रपटावर काँग्रेससोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यावर आता अभिनेत्री अदा शर्मानं सडेतोड उत्तर दिले आहे.
या चित्रपटात चूकिच्या गोष्टी दाखवण्यात आल्याचं किंवा चूकिचा प्रोपगंडा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असं म्हणतं त्यांनी चित्रपटाचा विरोध केला होता. या प्रकरणावर अदानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अदा म्हणाली, 'आमचा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. हा चित्रपट दहशतवादविरोधी संघटनेवर नक्कीच भाष्य करीत आहे. मुलींवर अत्याचार, अमली पदार्थांचे सेवन, मुलींचा कशा प्रकारे ब्रेनवॉश करण्यात येतो, त्या मुलींवर कशा प्रकारे बलात्कार करतात, इतकंच काय तर मानवी तस्करी आणि जबरदस्तीने गर्भधारणा करणे आणि त्यानंतर वारंवार बलात्कार करणे यासगळ्या विरोधात आहे. मुली ज्या बाळाला जन्म देतात त्यांना लगेचच त्यांच्यापासून दूर करण्यात येते आणि नंतर त्यांना आत्मघाती बॉम्बर बनवले जाते. हे सगळं इथेच थांबत नाही तर त्यासोबत अनेक गंभीर समस्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट भाष्य आहे.' हा व्हिडीओ शेअर करत अदानं 'प्रेम आणि प्रोपगंडा' असे कॅप्शन दिलं आहे.
Pyar and Propoganda full video on youtube #TheKeralaStory #AskAdah pic.twitter.com/klOxMzBFK5
— Adah Sharma (@adah_sharma) April 29, 2023
दरम्यान, याआधी अदानं एएनआयला देखील एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अदा बोलताना दिसली की 'एक माणूस विशेषत: एक मुलगी या नात्याने मला ही गोष्ट खूप भीतीदायक वाटते की मुली या गायब होत आहेत. या पेक्षा सगळ्यात जास्त भीतीदायक गोष्ट म्हणजे याला चुकीची माहिती देणं म्हणत आहेत. खरंतर मुली गायब होतात याविषयी आधी कोणी बोललं नाही याचं मला आश्चर्य वाटतं.' तर ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तुम्ही तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये पाहू शकता.