'मुकाबला' गाण्यावर पुन्हा एकदा थिरकला रॉकस्टार डीएसपी आणि प्रभुदेवा

आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस नुकताच पार पडला. या दिनानिमीत्त अनेक कलाकारांनी त्यांच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्येच आता  रॉकस्टार देवी श्री प्रसाद (डीएसपी)  आणि प्रभुदेवा यांनी भन्नाट डान्स केला आहे. 

Updated: Apr 30, 2023, 06:42 PM IST
'मुकाबला' गाण्यावर पुन्हा एकदा थिरकला रॉकस्टार डीएसपी आणि प्रभुदेवा  title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस नुकताच पार पडला. या दिनानिमीत्त अनेक कलाकारांनी त्यांच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्येच आता  रॉकस्टार देवी श्री प्रसाद (डीएसपी)  आणि प्रभुदेवा यांनी भन्नाट डान्स केला आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त  रॉकस्टार डीएसपी आणि डान्स मेस्ट्रो प्रभुदेवा यांनी एका खा गाण्यावर डान्स केला आणि हा दिवस खास केला.त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. डीएसपीने सोशल मीडियावर कॅप्शनसह पोस्ट शेअर केली आहे.

या व्हिडिओमध्ये दोघंही मुकाबला गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, आमच्या स्वतःच्या "डान्समधील MAESTRO" सोबत नाचण्यापेक्षा आनंदी काय असू शकते d1 & Only @PDdancing प्रभू देवा गुरु या आनंददायी दिवसासाठी, धन्यवाद प्रिय सर  धन्यवाद अररहमान सर आणि @shankarshanmugh अशा आयकॉनिक गाण्यासाठी सर.

त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर चाहते या व्हिडिओवप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, वाह सर क्या बात है. तर अजून एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे की, Prabu is a natural तर अजून एका युजर्सने कमेंट करत लिहीलं आहे की, तुमच्या जादुई कॉम्बोची पुन्हा वाट पाहत आहोत. तर अजून एकाने प्रभुदेवा.. नेहमी सारखीच सेम स्टेप.... असं म्हटलं आहे. तर अनेक जणांनी या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे तर काहींनी मात्र या व्हिडिओला जबरदस्त ट्रोल केलं आहे.

आपल्या नृत्याने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारा अभिनेता प्रभूदेवाला पुन्हा एकदा पाहून चाहते खूप खुश आहेत. प्रभूदेवाचा डान्स हा अगदी सुरूवातीपासूनच लोकप्रिय आहे. या गाण्यातून पुन्हा एकदा प्रभूदेवाचा हटके जलवा पाहायला मिळाला आहे. 'मुकाबला' या गाण्याच्या ओरिजनल वर्जनमध्ये प्रभूदेवासोबत अभिनेत्री नगमा डान्स करताना दिसली होती. 

अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवा हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम सिनेमात त्याने काम केले आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रभुदेवा याने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याचे चाहते त्याला भारतातील मायकल जॅक्सन मानतात. त्याला दोनदा बेस्ट कोरियोग्राफरचा नॅशनल फिल्म अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.