बाळाच्या जन्मानंतर Nusrat Jahan यांची घरवापसी; पाहा पती नव्हे प्रियकराकडे लहानग्याची जबाबदारी

बऱ्याच चर्चा, बरीच रहस्य, नात्यांची गुंतागुंत आणि आरोप- प्रत्य़ारोप या साऱ्या वातावरणानंतर अखेर अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ (nusrat jahan ) यांनी एका मुलाला जन्म दिला. मागील आठवड्यामध्ये त्यांनी बाळाला ज्नम दिला, ज्यानंतर आता त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. 

Updated: Aug 31, 2021, 05:05 PM IST
बाळाच्या जन्मानंतर Nusrat Jahan यांची घरवापसी; पाहा पती नव्हे प्रियकराकडे लहानग्याची जबाबदारी title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : बऱ्याच चर्चा, बरीच रहस्य, नात्यांची गुंतागुंत आणि आरोप- प्रत्य़ारोप या साऱ्या वातावरणानंतर अखेर अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ (nusrat jahan ) यांनी एका मुलाला जन्म दिला. मागील आठवड्यामध्ये त्यांनी बाळाला ज्नम दिला, ज्यानंतर आता त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. 

नुसरत रुग्णालयातून निघत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथं त्यांचा कथित प्रियकर यश दासगुप्ता (Yash Dasgupta) हा बाळाची जबाबदारी घेत त्याला उचलून नुसरतसोबत कारमध्ये बसताना दिसत आहे. फार काही न बोलता नुसरत यांनीही माध्यमांना अभिवादन करत तिथून काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 

पाहा, Corona ला विसरून हरयाणवी डान्सरला पाहण्यासाठी तोबा गर्दी; स्टेजवर तिचाच जलवा 

काही दिवसांपूर्वीच नुसरत यांनी बाळाला जन्म दिला. ज्यानंतर यशनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आई आणि बाळ सुखरुप असल्याचं सांगितलं होतं. नुसरकतला एकिकडून बाळाच्या जन्मानिमित्त शुभेच्छा दिल्या जात असतानाच दुसरीकडे तिच्या वैवाहिक आयुष्यातील वाढणारा गुंताही सर्वांचं लक्ष वेधत आहे. 

नात्यात गोंधळ... 
2019 मध्ये नुसरत यांनी व्यावसायिक निखिल जैनशी लग्न केलं होतं. ज्यानंतर विशेष विवाह कायद्याइंतर्गत हे नातं वैध नसल्याचा मुद्दा त्यांनी प्रकाशात आणला. आम्ही केव्हाच विभक्त झालो होतो. पण, मी त्याबाबत वाच्यता केली नव्हती. मला खासगी आयुष्यातील गोष्टी अशा उघडकीस आणायला आवडत नाहीत, असं त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, नुसरत यांचे सर्व आरोप त्यांच्या पतीकडून फेटाळण्यात आले होते.