सोनू निगमनंतर आता सुचित्रा कृष्णमूर्तीचं अजानबाबत ट्विट

गायक सोनू निगमनंतर आता अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीनंही अजानबाबत ट्विट केलं आहे.

Updated: Jul 24, 2017, 05:48 PM IST
सोनू निगमनंतर आता सुचित्रा कृष्णमूर्तीचं अजानबाबत ट्विट  title=

मुंबई : गायक सोनू निगमनंतर आता अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीनंही अजानबाबत ट्विट केलं आहे. सकाळी पावणेपाच वाजता घरी आले आहे. अजानच्या आवाजानं बहिरी झाली आहे. अशाप्रकारे धर्म कोणावर लादणं मूर्खपणा आहे, आणखी काही नाही, असं ट्विट सुचित्रा कृष्णमूर्तीनं केलं आहे.

या ट्विटनंतर सुचित्रा कृष्णमूर्तीवर सोशल नेटवर्किंगवर आणि समाजवादी पक्षाकडून जोरदार टीका होत आहे. काहीच महिन्यांपूर्वी सोनू निगमनंही अजानबद्दल अशीच एकापाठोपाठ चार ट्विट केली होती. लाऊडस्पीकरवर देण्यात येणाऱ्या अजानमुळे माझी झोपमोड होते. मी मुस्लिम नाही तरी या धार्मिक कट्टरता का सहन करू. असं करणं ही गुंडगिरी आहे, अशी ट्विट सोनू निगमनं केली होती. या ट्विटमध्ये सोनू निगमनं मंदिर आणि गुरुद्वारांमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरवरही टीका केली होती.