'कलाकार अजून जीवंत...' मालिकेत AIच्या वापरावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा प्रचंड संताप

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेमुळे घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री शर्मिला शिंदे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर कायमच शर्मिला खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामातून शर्मिला नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच शर्मिलाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  मालिकेत एआयचा वापर करून पात्र उभं केलं जातं असल्यामुळे.  मराठी अभिनेत्री  शर्मिला शिंदेला हे खटकलं आहे. नुकतीच शर्मिलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. शर्मिलाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

Updated: Jun 1, 2024, 08:03 AM IST
'कलाकार अजून जीवंत...' मालिकेत AIच्या वापरावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा प्रचंड संताप title=

मुंबई : 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेमुळे घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री शर्मिला शिंदे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर कायमच शर्मिला खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामातून शर्मिला नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच शर्मिलाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  मालिकेत एआयचा वापर करून पात्र उभं केलं जातं असल्यामुळे.  मराठी अभिनेत्री  शर्मिला शिंदेला हे खटकलं आहे. नुकतीच शर्मिलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. शर्मिलाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील दुर्गा म्हणजे अभिनेत्री शर्मिला शिंदे पोस्ट करत लिहिलं पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ''कृपया एआयचा वापर टाळा आणि हाडा मांसाचे कलाकार कास्ट करा. एआयला फार प्रोत्साहन देऊ नका. कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एक सारखे दिसणारे कलाकार सापडतील. मी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा सिनेमा बघितला नाहीये पण कौतुक ऐकलंय की बाबूजींच्या सिनेमामधल्या भूतकाळ आणि वर्तमानातल्या भूमिकांसाठी सुनील बर्वे व आदिश वैद्य यांचं कास्टिंग अगदी चपखल बसलंय.''

या पोस्टसोबतच शर्मिलाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''एखाद्या पात्राच तारुण्य किंवा वृद्धावस्था दाखवायला एआय कशाला हवंय. कला आणि कलाकार अजून जिवंत आहेत. काही विशेष किंवा अपरिहार्य परिस्थितीमध्ये गर्जेपुर्ता आणि मर्यादित वापर हा तंत्रज्ञानाचा योग्य वापर म्हणून समजला जाऊ शकतो. '' याशिवाय शर्मिलाने स्वतःची पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच अनेक युजर्सने यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहीलंय की, पण कोणता producer स्वस्तात होऊ शकणार काम महागात करायला तयार होईल.
तर अजून एकाने लिहीलंय, हेच कारण आहे, तू आम्हा सर्वांची आवडती असण्याचं. तर अजून एकाने म्हटलंय, माझ्या मनातलं सांगितलं दहा वर्षे ऑडिशन देतोय माझ्या कलाकार संधी नाही खुप प्रयत्न सुध्दा करतो माझ्या आईचं स्वप्न मला टिव्ही वरती बघायचं मला कुठे तुझ्या मालिकेत भुमिका असेल तर सांग. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स या पोस्टवर करत आहेत.