Shanya Kapoor च्या 'त्या' फोटोवरून Ananya Pandey चीच का होतेय एवढी चर्चा?

सध्या संजय कपूरच्या लेकीचा निळ्या ड्रेसमधला फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. 

Updated: Sep 22, 2022, 03:59 PM IST
Shanya Kapoor च्या 'त्या' फोटोवरून Ananya Pandey चीच का होतेय एवढी चर्चा?  title=

Shanaya Kapoor New Photoshoot: बॉलीवूडमधील स्टार कीड्स नेहमीच एकत्र अन् गुण्यागोविंदानं राहत असतात. त्यांच्यातील मैत्री पाहून सगळ्यांना हेवा वाटत असतो. पण सध्या बॉलीवूडच्या 'त्या' दोन स्टार कीड्समध्ये चांगलीच स्पर्धा रंगलेली दिसते ती म्हणजे संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे (Shanaya Kapoor and Ananaya Pandey). अर्थात स्पर्धा लावणारे नेटकरी शनायाच्या त्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर अनन्या पांडेशी तिची तुलना करताना दिसत आहेत. (actress shanaya kapoor shares new photoshoot on instagram netizens also compares her with ananya pandey)

सध्या संजय कपूरच्या लेकीचा निळ्या ड्रेसमधला फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. तिनं आपला हा नवा लुक इन्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. परंतु असे अनेक नेटकरी आहेत ज्यांना शनायाची तुलना अनन्या पांडेशी करावीशी वाटली. 

शनाया (Actress Shanya Kapoor) इन्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. ती तिचं नवं फोटोशूट नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. शनायानं या फोटोतून आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. परंतु हटके पोझसह स्टाईलिश लुकमध्ये शनाया दिसूनही शनायाच्या या फोटोवरून अनन्या पांडेचीच जास्त चर्चा होतेय. शनायानं स्लिक ब्लू शॉर्ट वनपीस घातला आहे. ज्यावर तिनं त्याच रंगाचा पण थोडा फिकट जॅकेट घातला आहे. तिचा ड्रेस हा खुप शॉर्ट आहे. त्यात ती प्रचंड ग्लॅमरस दिसते आहे. 

परंतु हा लुक पाहून शनायाचं कौतुक करण्यापेक्षा काहींना तिचा लुकची अनन्या पांडेशी तुलना केली आहे. अनन्यासारखा लुक तुला जमणार नाही अशी कमेंट केली आहे. तर काहींना तिच्या या शॉर्ट ड्रेसकडे पाहून टिकाही केली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, सगळ्यात वाईट फॅशन आजपर्यंत पाहिलेली तर दुसरा म्हणतोय की 25 रूपयांचं कापड घेऊन ड्रेस शिवलाय का? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शनाया लवकरच करण जोहरच्या चित्रपटातून काम करणार आहे. लवकरच तिचा बेधडक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.