भयंकर प्रसंगांमध्ये अडकले.... ; नागा चैतन्यपासून वेगळी होणारी समंथा अखेर व्यक्त झालीय

4 वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर घटस्फोट घेतला आणि... 

Updated: Mar 2, 2022, 11:18 AM IST
भयंकर प्रसंगांमध्ये अडकले.... ; नागा चैतन्यपासून वेगळी होणारी समंथा अखेर व्यक्त झालीय  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मागील वर्षी चाहत्यांच्या अतिशय आवडीची जोडी, समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय कलाजगतासोबतच चाहत्यांना जबर धक्का दोणारा ठरला. (Naga chaitanya samantha ruth prabhu)

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी, या अशा वळणावर नेमकी का आणि कशी पोहोचली हाच प्रश्न चाहत्यांनी विचारण्यास सुरुवात केली. 

मुख्य म्हणजे एखाद्या नात्यातून विभक्त होणं हे किती कठीण असतं, हे समंथा आणि नागा चैतन्य यांच्याहून दुसरं कोणीही जाणू शकत नाही. 

कारण नात्यात आलेला हा दुरावा त्यांनाही सतावत होता. समंथा तेव्हापासून सातत्यानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मानसिक स्थैर्याकडे नेणारे काही स्टेटस शेअर करत होती. 

त्यातच तिनं पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिथं, सद्गुगुरू अतिशय महत्त्वाची गोष्ट मांडताना दिसतात. 

'जरी तुम्ही एखाद्या भयंकर प्रसंगात अडकता, त्यात तुम्हाला धकललं जातं तेव्हा एकतर तुम्ही त्या प्रसंगातून एक चांगली व्यक्ती म्हणून बाहेर पडता किंवा त्याचा वापर तुम्ही एक अस्थिर आणि भेदरवणारी व्यक्ती होण्यासाठी करता'. 

समंथानं शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींशी जोडला असता त्याचं गांभीर्य आणि तो शेअर करण्यामागचं कारण अधिक सुस्पष्ट होताना दिसतं.