दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री साई पल्लवी अडकणार लग्न बंधनात!

साईने 'मारी-2', 'प्रेमम' आणि 'लव्ह स्टोरी' सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. साई पल्लवी लवकरच अभिनेता राणा दग्गुबतीसोबत 'वीरता पर्वम' चित्रपटात दिसणार आहे.

Updated: Jun 7, 2022, 07:32 PM IST
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री साई पल्लवी अडकणार लग्न बंधनात! title=

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी हिचे लाखो चाहते आहेत. साईने अभिनय आणि नृत्याच्या जोरावर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. साईने 'मारी-2', 'प्रेमम' आणि 'लव्ह स्टोरी' सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. साई पल्लवी लवकरच अभिनेता राणा दग्गुबतीसोबत 'वीरता पर्वम' चित्रपटात दिसणार आहे. पण सध्या साई चित्रपटांमुळे नाही तर लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साई पल्लवी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. साईने लवकरात लवकर लग्न करून सुखी संसार करावा, अशी अभिनेत्रीच्या पालकांची इच्छा आहे. त्यामुळेच तिचे कुटुंबीय योग्य वराच्या शोधात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साईचा आगामी चित्रपट 'वीरता पर्वम' रिलीज झाल्यानंतर ती लग्नबंधनात अडकू शकते.

साई पल्लवी मेडिकलची विद्यार्थिनी आहे. मात्र, तिने चित्रपटात काम करणं पसंत केलं. टॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने फार कमी वेळात यश मिळवले. आपल्या साधेपणामुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे साई नेहमीच लोकांची आवडती अभिनेत्री राहिली आहे. साई शेवटची नागा चैतन्यसोबत 'लव्ह स्टोरी' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.