अभिनेत्री रिंकू राजगूरुने गुपचूप बांधली लग्नगाठ? फोटो व्हायरल

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने या सिनेमातून या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि पहिल्याच चित्रपटात हिट झाली. सैराटनंतर तिला अनेक सिनेमांची ऑफर आली. तिने हिंदी सिनेमा आणि वेब सीरीजमध्ये ही काम केलं. सैराट सिनेमातून घराघरात पोहचलेली रिंकू राजगुरु सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Updated: Nov 3, 2023, 02:47 PM IST
अभिनेत्री रिंकू राजगूरुने गुपचूप बांधली लग्नगाठ? फोटो व्हायरल title=

मुंबई :  'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने या सिनेमातून या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि पहिल्याच चित्रपटात हिट झाली. सैराटनंतर तिला अनेक सिनेमांची ऑफर आली. तिने हिंदी सिनेमा आणि वेब सीरीजमध्ये ही काम केलं. सैराट सिनेमातून घराघरात पोहचलेली रिंकू राजगुरु सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर रिंकूचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिंकू कायमच स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. लवकरच अभिनेत्री रिंकू 'झिम्मा २' या सिनेमात झळकणार आहे.  सध्या अभिनेत्री तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

नुकतेचरिंकूने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. खरंतर हा फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. लाईक्स कमेंट्सचा वर्षाव अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहते करत आहेत. रिंकूने शेअर केलेल्या या फोटोत रिंकू लग्नबंधनात अडकल्याचं युजर्स म्हणणं आहे. कारण या फोटोत अभिनेत्री हिरव्या रंगाची साडी. कपाळी लाल टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र असा हा अभिनेत्रीचा संपुर्ण लूक आहे. त्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीचं लग्न झाल्याचं म्हटलं आहे. पण अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, हा सिनेमा (आशा) माझा अतिशय जवळचा आणि हार्डवर्किंग प्रोजेक्ट अखेर पूर्ण झाला लवकरच भेटू #filmwrap#aasha#

अभिनेत्रीच्या या पोस्टवरु हे लक्षात येतंय की, अभिनेत्रीची ही पोस्ट तिच्या सिनेमाची आहे. त्यामुळे तिने तिचा हा लूक तिच्या सिनेमासाठी केला आहे. एका युजर्सने कमेंट करत लिहीलं आहे की, मंमीची copy तर अजून एकाने लिहीलं की, मराठी सिनेमासृष्टीला लाभलेली परी. तर अजून एकाने लिहिलं आहे की, घरंदाज तर अजून एकाने लिहीलंय की, खूप सुंदर. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते तिच्या फोटोवर करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे फोटो  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे रिंकूच्या लग्नाच्याच चर्चा होत आहेत हेसुद्धा तितकंच खरं. रिंकूचा हा अंदाज आणि तिची अदा पाहता सोशल मीडियावर तिच्या या प्रोजक्टविषयी आणखीन जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.