चित्रपटसृष्टीतून धक्कादायक बातमी, आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येने खळबळ

आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या बातमीने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. 

Updated: Sep 20, 2022, 05:14 PM IST
चित्रपटसृष्टीतून धक्कादायक बातमी, आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येने खळबळ title=

मुंबई : चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंडस्ट्रीतील नवीन अभिनेत्री पॉलीन जेसिका (Pauline Jessica) उर्फ ​​दीपा हिचे निधन झाल्याचे वृत्त आहे. साउथ अभिनेत्री दीपा उर्फ ​​पॉलीन जेसिका तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याचे वृत्त आहे. अभिनेत्रीच्याच अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या प्रेमजीवनातील समस्यांमुळे आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. (Tamil actress Pauline Jessica found hanging)

पॉलीन जेसिका (Pauline Jessica) म्हणजेच दीपाचा मृतदेह तिच्या घराच्या एका खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. चेन्नईच्या विरुगम्बक्कम मल्लिकाई एव्हेन्यूमध्ये ती एकटीच राहत होती. पोलीस तपास करत आहेत.  रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की दीपाचे पालक तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्यास भाग पाडत होते. दीपा मायस्किन दिग्दर्शित 'थुप्परीवलन' या हिट चित्रपटातही दिसली होती.

29 year old Tamil actress Deepa aka Pauline Jessica found hanging on her  flat | Actress Dies: मशहूर एक्ट्रेस ने इतनी सी उम्र में कर ली आत्महत्या, घर  के पंखे से लटका

तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिकाला लोक प्रेमाने दीपा म्हणायचे आणि तिला या नावानेच ओळख मिळाली. रिपोर्टनुसार तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. या बातमीनंतर संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

पॉलीन जेसिकाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती वैद्य या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटासोबतच ती थुप्परीवलनमध्येही दिसली होती. यासोबतच ती सहाय्यक भूमिकेतही दिसली आहे.