Boyfriend सोबत महिला खासदारचे व्हेकेशन फोटो व्हायरल...

ती तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत इन्टाग्रामवरून शेअर करत आहे.

Updated: Sep 9, 2022, 10:34 PM IST
 Boyfriend सोबत महिला खासदारचे व्हेकेशन फोटो व्हायरल... title=

Nusrat Jahan: बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) सध्या थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. अभिनयासोबतच खासदार असलेली नुसरत तिच्या प्रियकरासोबत म्हणजेच अभिनेता यश दासगुप्तासोबत (Yash Dasgupta) सुट्टीवर आहे. (actress nusrat jahan new vacation photos goes viral boyfriend yash dasgupta seen with her viral photos social media)

ती तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत इन्टाग्रामवरून शेअर करत आहे. नुकतेच तिने आपले बिकिनीतले फोटो पोस्ट केल्यानंतर नुसरतने तिच्या व्हेकेशनचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत. 

नुसरत जहाँ यश दासगुप्तासोबत थायलंड व्हेकेशनचा भरपूर आनंद घेत आहे. हे दोघे थायलंडमधील प्राणीसंग्रहालयाच्या उद्यानात गेले होते, जिथे त्यांनी चित्ता, बिबट्या आणि हत्तीसोबत फोटो काढले. या फोटोंमध्ये नुसरत आणि यश डेनिम आणि पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये एकमेकांना शोभून दिसत होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुसरत जहाँने पिवळ्या हॉल्टरसह निळ्या डेनिम परिधान केली होती. तर यशने निळ्या डेनिमसोबत पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या स्ट्रीप शर्ट घातला होता. नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे यशाचे स्वागत केले.