तरुणांच्या मनाची राणी असणारी 'ही' अभिनेत्री आता एका बाळाची आई

पहिल्यांदा आई झाल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना  

Updated: Apr 1, 2022, 12:46 PM IST
तरुणांच्या मनाची राणी असणारी 'ही' अभिनेत्री आता एका बाळाची आई title=

मुंबई : ‘तू तिथे मी’आणि  ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकांमधून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. मृणालने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मृणाल सोशल मीडियावर मुलीची एक झलक दाखवत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

इन्स्टाग्रामवर लेकीचं फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'वडिलांची छोटी मुलगी आणि आईचं संपूर जग... आमच्या परीचं आगमन...' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मृणालने मुलीचं नाव नुर्वी ठेवलं आहे. मृणालने 24 मार्च 222 रोजी पहिल्या बाळाला जन्म दिलं आहे. मृणालने फोटो शेअर केल्यानंतर तिच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.