Valentine's Day च्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्रीनं बांधली लग्नगाठ, पतीच्या निधनानं आज ती मात्र एकटी

आज तू असतास तर ही आपली 23 वी अॅनिव्हर्सरी असती, असं कॅप्शन लिहिलं. 

Updated: Feb 14, 2022, 01:01 PM IST
Valentine's Day च्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्रीनं बांधली लग्नगाठ, पतीच्या निधनानं आज ती मात्र एकटी title=
प्रतिकात्मक छाय़ाचित्र

मुंबई : Valentine's Day हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या हक्काच्या आणि प्रेमाच्या माणसावर तितक्याच हक्कानं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. याच दिवशी अनेकांच्याच काही खास आठवणी जोडल्या गेल्या आहेत. बऱ्याच कलाकारांनीही याच निमित्तानं त्यांच्या जोडीदारासोबतचा प्रवास आणि आठवणीही प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. 

पण, अभिनेत्री मंदिरा बेदी ही मात्र या दिवशी काहीशी भावूक झाली आहे. त्यामागचं कारण म्हणजे तिच्या मनात माजलेला भावनांचा काहूर. 

आजच्याच दिवशी 23 वर्षांपूर्वी मंदिरानं राज कौशल यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. एकमेकांची साथ देण्यासाठीचं वचन त्यांनी दिलं. पण, राज अर्ध्यावरच तिची साथ सोडून गेले आणि सर्व स्वप्न उध्वस्त झाली. 

राज आपल्या सोबत नसण्याचं दु:ख किती मोठं आहे, हे मंदिराची पोस्ट पाहून लक्षात येत आहे. जिथं तिनं, आज तू असतास तर ही आपली 23 वी अॅनिव्हर्सरी असती, असं कॅप्शन लिहिलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

राज कौशलच्या अकाली मृत्यूमुळं मंदिरा पुरती तुटली. ज्या प्रेमाच्या दिवशी तिनं लग्नगाठ बांधली, त्याच दिवशी तिला त्याची साथ नाही हे किती दुर्दैव... 

मंदिराच्या आयुष्यातील या दु:खाला तुम्हीआम्ही शब्दांत मांडू शकत नाही. पण, तरीही या अभिनेत्रीला दिलासा मात्र नक्कीच देऊ शकतो.