बाबासाहेबांविषयी असं गाणे रचलं जातेय, हा अपमान नाही का? व्हिडिओ शेअर करत केतकी चितळेचा रोखठोक सवाल

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी रचलेलं गाण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हे गाणं शेअर करत तिने रोखठोक सवाल केला आहे. तिच्या प्रश्नावर अनेक युजर्स कमेंट्स करत उत्तर देत आहेत. यामुळे पुन्हा एकदा मोठा ओढावण्याची चिन्हे आहेत. 

Updated: Jan 10, 2023, 12:16 AM IST
बाबासाहेबांविषयी असं गाणे रचलं जातेय, हा अपमान नाही का? व्हिडिओ शेअर करत केतकी चितळेचा रोखठोक सवाल title=

Ketaki Chitale Post : मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेमहीच चर्चेत असते. विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विषयांवर ती वादग्रस्त भूमिका मांडत असते. आता तिने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी रचलेलं गाण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे(dr. babasaheb ambedkar song). हे गाणं शेअर करत तिने रोखठोक सवाल केला आहे. तिच्या प्रश्नावर अनेक युजर्स कमेंट्स करत उत्तर देत आहेत. यामुळे पुन्हा एकदा मोठा ओढावण्याची चिन्हे आहेत. 

ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हंटले जाते, जे भारताचे पहिले लॉ मिनिस्टर, यादी खूप मोठी आहे, त्यांच्या विषयी असे गाणे रचले जाते, रिलीज होते, आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत!? हा बाबासाहेब आंबेडकर, यांचा अपमान नाही का? हा ब्राह्मण द्वेष नाही का? असा सडेतोड सवाल केतकीने उपस्थित केला आहे. 

या गाण्यात  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास मांडण्याचा प्रयत करण्यात आला आहे. मात्र, या गाण्याचे बोल केतकीला खटकले आहेत. यावरुनच थेट हे गाणं शेअर करत केतकीने प्रश्न उपस्थित करत लोकांना प्रतिक्रिया भाग पाडले आहे.  1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा न दिल्याने केतकी ट्रोल झाली होती. 

केतकी चितळेने महाराजांवरची 'ती' पोस्ट केली होती डिलीट

काही दिवसांपूर्वीच केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होता, तसेच महाराजांच्या मावळ्यावर सडकून टिका करण्यात आली होती. ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिने ती डिलीट केली होती. मात्र पोस्ट डिलीट केल्यानंतरही ती चर्चेत आली होती.