Happy Birthday Hrithik : सुपरस्टार हृतिक रोशनला लहानपणी झाला होता 'हा' गंभीर आजार

'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिकने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हृतिकचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला होता.

Updated: Jan 9, 2023, 11:30 PM IST
Happy Birthday Hrithik : सुपरस्टार हृतिक रोशनला लहानपणी झाला होता 'हा' गंभीर आजार  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज अभिनेत्याने ४९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. नेहमी हृतिक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. 
सध्या तो एका नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे. त्याच्याहून 17 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोघंही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. 

'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिकने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हृतिकचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने त्याला रातोरात सुपरस्टार बनवले. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जवळपास प्रत्येक प्रकारच्या भूमिका साकारणाऱ्या हृतिक रोशनने इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण केली आहेत. या 20 वर्षांत हृतिकने अनेक चढउतार पाहिले आहेत.

'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिकला इंडस्ट्रीत ओळख मिळाली असेल पण तुम्हाला माहित आहे का की त्याने त्याच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केलं होतं. त्याचबरोबर हृतिकला लहानपणापासूनच एका गंभीर आजाराने ग्रासलं होतं, त्यामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. चला जाणून घेऊया हृतिकच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी...

बॉलिवूडचा आकर्षक अभिनेता हृतिक रोशनचे जगभरात अनेक चाहते आहेत. बहुतेक लोक हृतिक रोशनचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है' मानतात. या चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं आहे. पण प्रत्यक्षात हृतिक रोशनने 1980 मध्ये 'आशा' चित्रपटातून बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर 1986 मध्ये 'भगवान दादा' या चित्रपटातही तो दिसला. लहानपणापासूनच हृतिकला अभिनयाची पूर्ण जाण होती असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. हृतिकने बाल कलाकार म्हणून अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लहानपणी या आजाराने ग्रासलं होतं
हृतिकला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, पण एका आजारामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हृतिकला लहानपणापासूनच बोबड बोलण्याचा त्रास होत होता. या आजारामुळे त्याच्या अभिनय कारकिर्दीवर धोक्याचे ढग दाटून आले होते. त्याचवेळी हृतिकचे वडील राकेश रोशन यांनीही त्याला याबद्दल खडसावलं. ते म्हणाले की अभिनयासाठी स्पष्टपणे बोलणं खूप महत्वाचं आहे,  मात्र हृतिक एका लाईनमध्ये बोलतानाच बोबडं बोलायचा. यानंतर त्याच्या पालकांनी त्याला स्पीच थेरपी देण्यास सुरुवात केली.