अखेर प्रेग्नंन्सीवर कतरिना सोडणार मौन? Sex लाईफबद्दल करणार मोठा खुलासा

करीना आणि आलियापाठोपाठ आता कतरिनाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे. 

Updated: Dec 7, 2022, 07:37 PM IST
अखेर प्रेग्नंन्सीवर कतरिना सोडणार मौन? Sex लाईफबद्दल करणार मोठा खुलासा title=

Katrina Kaif Preganancy: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती कतरिना कैफची. करीना आणि आलियापाठोपाठ आता कतरिनाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे. नुकतेच कतरिनाने आपले हटके फोटोशूट शेअर केले आहे ज्यात ती आपले बेबी बंप लपवताना दिसत आहे असं निरिक्षण खुद्द तिच्या चाहत्यांनीच केलं आहे. आपल्या प्रेग्नंन्सीच्या या अफवांवर अद्याप कतरिनाने कसलाच खुलासा केला नाहीये अथवा कोणती टिप्पणी केली आहे. करिनाने आपल्या तिसऱ्यांदा प्रेग्नंन्ट असण्याच्या अफवांना बगल देत ट्रोलर्सना चांगलेच खडेबोल सुनावले होते. आता कतरिना आपल्या प्रेग्नंन्सीच्या चर्चेंना काय उत्तर देते? याची उत्सुकता चाहत्यांना आहे. 

कतरिनाचा 'फोन भूत' हा चित्रपट या ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे त्यानिमित्ताने कतरिना आपले सहकलाकार ईशान खत्रर आणि सिद्धात चतुर्वेदीसह दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये हजेरी लावणार आहे. या शोमधून कतरिना आपल्या सेक्स लाईफबद्दल आणि प्रेग्नंन्सीबद्दल खुलासा करेल अशी शक्यता व्यक्त केल्याचे बोलले जाते आहे. 

खरंतर 'कॉफी विथ करण' या शोमध्ये सेक्स लाईफ, रिलेशनशिप्स आणि प्रेग्नंन्सी अशा विषयांवर मोकळेपणाने आणि विनोदी अंगाने चर्चा केली जाते. त्यामुळे कतरिना, करिना किंवा अगदी आलिया यांपैंकी कोणी असो करण नेहमीच त्यांना त्यांच्या पर्सनल लाईफपासून ते सेक्स लाईफपर्यंत प्रश्न विचारतो. तेव्हा कतरिनाला आपल्या नव्या एपिसोेडमधून तिच्या सेक्स लाईफबद्दल विचारणार याबद्दल चाहत्यांना खात्री वाटते आहे त्यामुळे ही बातमी सध्या वाऱ्यासारखी पसरते आहे. 

सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार कतरिना कैफ करण जोहरच्या चॅट शोमध्ये विकी कौशलसोबत तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलणार आहे. तिची आणि विकीची भेट कशी झाली? आणि मग दोघेही एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? आणि हे प्रकरण लग्नापर्यंत कसे पोहोचले? हे कतरिना सांगणार आहे. करणच्या शोमध्ये कतरिना तिच्या प्रपोजलबद्दलही बोलणार आहे.

कतरिनाही तिच्या आणि विकीच्या सेक्स लाईफबद्दल खुलेपणाने सांगणार असल्याची सध्या चर्चा आहे. याशिवाय कतरिना करण जोहरच्या शोमध्ये तिच्या प्रेग्नेंसीचे सत्यही जगासमोर आणणार आहे. 

मागच्या वर्षी 9 डिसेंबरला कतरिना आणि विकी कौशलचे राजस्थानमध्ये लग्न झाले. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.