ज्यांच्यामुळं लग्न मोडलं, त्याच धर्मेंद्र यांना हेमा मालिनींनी पती म्हणून स्वीकारलं

मात्र, तेवढ्यातच या कथेत एक ट्विस्ट आला.

Updated: Mar 5, 2022, 03:19 PM IST
 ज्यांच्यामुळं लग्न मोडलं, त्याच धर्मेंद्र यांना हेमा मालिनींनी पती म्हणून स्वीकारलं title=

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी कायमच चर्चेत राहिली आहे. ज्यांच्या प्रेम कहाणीचे किस्से आजही चर्चेचा विषय ठरतात. 

अभिनेत्री हेमा मालिनी त्यांच्या काळातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज कुमार, जितेंद्र ते संजीव कुमार यांच्यासोबतच त्या काळातील सर्व कलाकार हेमा मालिनी यांच्यावर फिदा होते.

संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांना दोनदा लग्नासाठी विचारले. त्याचवेळी हेमा यांनी आपल्याशी लग्न करावे अशी राज कुमार यांची ही इच्छा होती. या सगळ्यात हेमा यांनी जितेंद्र यांना पसंत केले होते.

इतकंच नाही तर हेमा मालिनी यांच्या कुटुंबीयांनाही जितेंद्र पसंत होते. दरम्यान, जितेंद्र आणि हेमा यांचे लग्न ठरले, हे लग्न मद्रासमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये होणार होते. मात्र, तेवढ्यातच या कथेत एक ट्विस्ट आला.

खरं तर, जितेंद्र यांची आधीच एक गर्लफ्रेंड होती. जिचं नाव शोभा कपूर असं होतं. शोभा या जितेंद्र यांच्या पत्नी आहेत. जितेंद्र आणि हेमाच्या लग्नाची बातमी शोभा यांना कळताच त्या खूप काळजीत पडल्या, अशा परिस्थितीत शोभाने धर्मेंद्र यांच्याकडे मदत मागितली. धमेंद्र हेमा यांच्यावर प्रेम करत होते, त्यामुळे त्यांनी शोभा यांच्यासोबत लगेच मद्रास गाठले.

यानंतर नेमके तेच घडले जे सहसा चित्रपट किंवा टीव्ही मालिकांमध्ये घडते. शोभा यांनी येथे खळबळ उडवून दिली आणि त्यामुळे जितेंद्र आणि हेमाचे लग्न मोडले, असे सांगितले जाते.