Dolly Sohi Passes Away cervical cancer : ‘झनक’ फेम अभिनेत्री डॉली सोहीचं निधन. बहीण अमनदीपच्या निधनाच्या काही तासातच घेतला अखेरचा श्वास. डॉली ही 48 वर्षांची होती आणि ती सर्वाइकल कॅन्सरला लढा देत होती. डॉलीच्या बहिणीचं निधन अमनदीप सोहीचं काल निधन झालं. अमनदीपचं निधन कावीळमुळे झालं. तर डॉलीचं निधन कॅन्सरमुळे झालं. डॉलीचा भाऊ मनु सोहीनं तिच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
ईटाइम्स टीव्हीनं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, डॉलीच्या कुटुंबानं सांगितलं ती डॉलीचा मृत्यू आज सकाळी झाला. तिच्या निधनानं कुटुंबातील सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार आज दुपारी करण्यात येणार आहे. तर तिचा भाऊ मनूनं त्यांची बहीण अमनदीप सोहीच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली होती. तर काहीच वेळात त्याची दुसरी बहीण म्हणजेच डॉली सोहीच्या निधनाची बातमी समोर आली आहे.
मनू सोहीनं सांगितलं की अमनदीपचं निधन झाल्याची बातमी खरी आहे, तिच्या आत्म्यानं तिच्या शरीराचा त्याग केला आहे. तिला कावीळ झाली होती अजून आम्हाला डॉक्टरांकडून जास्त माहिती मिळालेली नाही. अमनदीपविषयी बोलायचे झाले तर मनुनं डॉलीच्या आरोग्याविषयी देखील अपडेट दिली होती. त्यानं सांगितलं होतं की डॉलीची अवस्था गंभीर आहे पण तिला सध्या आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, आज सकाळी डॉलीचे निधन झाले. गेल्या वर्षी 2023 मध्ये डॉलीला सर्वाईक कॅन्सरचे निदान झाले. त्यानंतर तिनं मालिका देखील सोडली होती. तर गेल्या काही दिवसांपासून डॉलीला श्वास घेण्यास त्रास होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रीटमेंट सुरु झाल्याच्या काही दिवसात ती ठीक झाली होती. डॉलीचं लग्न एनआरआय अवनीत धनोवाशी झालं होतं. लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात वाद सुरु झाले. तर डॉली आणि अवनीतला एक मुलगी असून तिचं नाव एमिली आहे. डॉलीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती 'भाभी', 'झांसी की रानी', 'कलश', 'हिटलर दीदी', 'देवों के देव महादेव', 'झनक' सारख्या मालिकेत तिनं काम केलं आहे.
हेही वाचा : कॉपी...? राधिका मर्चंटनं अनंतसाठी बोललेला प्रत्येक शब्द 'इथून' उचललेला सांगत नेटकऱ्यांकडून Video Viral
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूनम पांडे कॅन्सरमुळे चर्चेत होती. त्यावर डॉलीनं वक्तव्य केलं होतं की पूनमसारख्या लोकांमुळे ज्यांना कॅन्सर आहे त्यांना त्रास होतो. ते कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराची थट्टा करतात.