'12 वर्षांपूर्वी बहिणीचा सांगाडाच सापडला पण आजही मी तिला फोन करते'; अभिनेत्रीचा खुलासा

Actress On Sister Murder Skeleton Found: या अभिनेत्रीच्या बहिणीचा मृतदेह ती बेपत्ता झाल्यानंतर महिन्याभराने सापडला. मात्र ही हत्या असल्याचा दावा या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 20, 2024, 01:09 PM IST
'12 वर्षांपूर्वी बहिणीचा सांगाडाच सापडला पण आजही मी तिला फोन करते'; अभिनेत्रीचा खुलासा title=
मुलाखतीमध्ये केलं भाष्य

Actress On Sister Murder Skeleton Found: संगीतकार जोडी जतीन-ललीत तसेच अभिनेत्री सुलक्षणा आणि विजयता पंडीत यांची बहीण संध्या पंडित 2012 साली अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर महिन्याभराने संध्या यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला होता. मृतदेह सापडला तेव्हा संध्या यांच्या मृतदेहावरील मांस कुजलं होतं अगदी सांगाडा दिसत होता. या प्रकरणानंतर ठाणे कोर्टाने संध्या यांचा मुलगा रघुवीरची निर्दोष मुक्तता केली होती. आता विजयता यांनी लेहरे रेट्रोला दिलेल्या नव्या मुलाखतीमध्ये, संध्या यांच्या हत्येबद्दल भाष्य केलं आहे. तसेच मृत्यूला 12 वर्षांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही सुलक्षणा यांना त्यांच्या बहिणीच्या मृत्यूसंदर्भात घरच्यांनी का सांगितलेलं नाही याबद्दलही विजयता यांनी माहिती दिली आहे. 

तिची हत्या झाली

विजयता यांनी, "तिची (संध्याची) हत्या करम्यात आली. असं काही घडेल याचा आम्ही कधी विचारही केला नव्हा. लग्नानंतर ती फार आनंदात होती. नेमकं काय घडलं मला ठाऊक नाही. आम्हाला ती कधी भेटलीच नाही. तिचा सांगाडाच नंतर सापडला. आधी तिच्या कुटुंबाने ती बेपत्ता झाल्याचं सांगितलं. त्यामुळे मी आणि माझे बाऊ जतीन-ललीत तिला शोधण्यासाठी हिंडायचो. नंतर काही काळाने तिची हाडं इकडे तिकडे विखुरलेल्या अवस्थेत सापडली. ही फारच धक्कादायक आणि मोठी गोष्ट होती," असं मुलाखतीत सांगितलं. 

आजही बहिणीला वाटतं की ती जिवंत आहे

"तुमचा विश्वास बसणार नाही की सुलक्षणाला आजही तिची बहीण मरण पावली आहे हे ठाऊक नाही. तुमचा यावर विश्वास बसेल का? मी हे पहिल्यांदाच असं जाहीरपणे सांगतेय. मी तिला कधीच हे सांगितलं नाही. कारण तिला हे कळलं तर पुढल्या क्षणी तिचा मृत्यू होईल. मी तिला सांगत असते की आपली बहीण सुखरुप असून इंदूरमध्ये राहते. ती मला कॉलही करते. मी तिला कॉल करते असंही मी सुलक्षणाला सांगते. त्यामुळे सुलक्षणाला संध्या जिवंत आहे असं वाटतंय. ती मोबाईल वापरत नसल्याने मलाच तिची खुशाली विचारायला सांगते. मी देवाची शपथ घेऊन सांगते की आजही मला हे नाटक कायम ठेवावं लागत आहे," असं विजयता यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं.

कोर्टाने या प्रकरणात काय म्हटलं?

2021 मध्ये 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, 2012 साली संध्या यांच्या मुलाला ठाणे सत्र न्यायालयाने सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं. आरोपीला दारुचं व्यसन होतं आणि त्याचं व आईचं भांडण होतं याशिवाय वकिलांना काहीच सिद्ध करता आलं नाही, असं म्हणत कोर्टाने रघुवीरची निर्दोष मुक्तता केली होती. हत्या, चोरी, पुरावे नष्ट करणे यासारख्या गुन्ह्यांमधून रघुवीरची निर्दोष मुक्तता केलेली. मुंबई पोलीस गुन्हे शाखेने रघुवीरविरुद्ध दाखल केलेला गुन्हा हा केवळ संशयाच्या आधारे करण्यात आल्याचंही न्यायालयाने म्हटलं.