लाडक्या लेकीसाठी बिपाशानं घेतली आलिशान ऑडी! किंमत वाचून डोकं गरगरायला लागेल

Bipasha Basu Audi Car: आईवडिल हे आपल्या मुलांसाठी कायमच संघर्ष करताना दिसतात. आपल्या मुलांची इच्छा पुर्ण व्हावी म्हणून आणि आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून पालक हे कायमच झटतं असतात. तेव्हा बॉलिवूड सेलिब्रेटी याला अपवाद कसे ठरतील. सध्या बॉलिवूडची अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu Trending News) हिनं आपल्या लाडक्या लेकीसाठी नवी ऑडी कार घेतली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 30, 2023, 07:05 PM IST
लाडक्या लेकीसाठी बिपाशानं घेतली आलिशान ऑडी! किंमत वाचून डोकं गरगरायला लागेल title=
May 30, 2023 | Bipasha Basu Buys new car आपण आपल्या मुलांसाठी ते हरएक प्रयत्न करतो ज्यातून आपली मुलं ही खुश राहतील आणि त्यांची स्वप्न पुर्ण होतील. बिपाशानंही आपल्या लेकीचं स्वप्न पुर्ण केलं आहे. (Photo: Bipasha Basu | Instagram)

Bipasha Basu Audi Car For Devi: अभिनेत्री बिपाशा बापू ही कायमच तिच्या हटके डान्स आणि स्टाईल्ससाठी ओळखली जाते. नोव्हेंबर महिन्यात तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 2016 मध्ये विवाहबंध झालेले करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बासू यांना मागील वर्षी कन्यारत्न (Bipasha Basu Daughter Gift) झालं आहे. बिपाशानं आपल्या मुलीचं नावं हे देवी असं ठेवलं आहे. यावर्षी तिनं आपल्या लेकीचा फोटोही चाहत्यांसोबत शेअर केला होता तो सगळीकडेच व्हायरल झाला होता. आपल्या लेकीसह बिपाशा ही अनेक नानाविध व्हिडीओज शेअर करत असते त्यामुळे तिच्या या फोटो आणि व्हिडीओची कायमच चर्चा होताना दिसते. आता आपल्या लेकीसाठी बिपाशानं चक्क एक कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत जवळपास 92 लाखांच्या आसपास असल्याचे समजते आहे. 

याबद्दलची माहिती खुद्द बिपाशानं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून दिली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. ही ऑडीची कार (Audin Car Price) आहे. बिपाशानं टाकलेल्या व्हिडीओतून तुम्ही पाहू शकता की ही एका पांढऱ्या रंगाची आलिशान कार आहे. यामध्ये या दोघांनी आपल्या नव्या कारची गुडन्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. बिपाशानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''देवीची पहिली राईड''. सध्या तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे बिपाशाचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

हेही वाचा - एकमेकांच्या जीवावर उठले होते बॉलिवूडचं 'हे' दिग्गज कपल; खुद्द अभिनेत्रीच केला खुलासा

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवरनं AudiQ7 ही गाडी विकत घेतली आहे. ही गाडी घेतल्यावर त्यानं गाडीचं ओपनिंग केलं आहे. त्याचसोबत त्यांनी यावेळी जंगी सेलिब्रेशन केलं आहे. यावेळी त्यांनी केक कापला आणि ऑडीच्या गाडीच्या रंगाप्रमाणे त्यांनी मोनोक्रुमॅटिक कपडे परिधान (Bipasha Basu Audir Car Colour) केले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून गेला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या गाडीची किंमत ही 84.70 लाख ते 92.30 लाखांपर्यंत आहे. बिपाशा बासू ही सध्या हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ती तिच्या डान्स स्टाईल्ससाठी ओळखली जाते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करण सिंग ग्रोवरला बिपाशा बासू ही 2015 सालापासून डेट करते आहे. करणला डेट करण्यापुर्वी ती अभिनेता जॉन अब्राहमला डेट करत होती. परंतु काही कारणास्तव त्यांचे नाते तूटले. आता जॉन अब्राहम वेगळ्या मुलीला डेट करतो आहे. करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बासू हे अनेकदा त्यांचा फॅमिली टाईम एकमेकांसोबत व्यतीत करताना दिसतात.