अभिनेत्री माधुरी पवार का म्हणतेय ‘नाच गड्या’!

Madhuri Pawar : माधुरी पवारच्या नव्या गाण्याची चर्चा... पाहा व्हिडीओ

दिक्षा पाटील | Updated: May 12, 2024, 02:22 PM IST
अभिनेत्री माधुरी पवार का म्हणतेय ‘नाच गड्या’! title=
(Photo Credit : PR Handover)

Madhuri Pawar : मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या अभिनय नृत्यांतून प्रेक्षकांची मने जिंकणारी माधुरी आता ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती आपल्या नृत्याचा जलवा दाखवणार आहे. आपल्या मोहक अदांनी घायाळ करणाऱ्या माधुरीवर एक धमाकेदार आयटम नंबर चित्रीत झालं आहे. ‘दणक्यात साजरा करूया जागर नाच गड्या वाकडा तिकडा रांगडा तू नाच’ असे बोल असलेले हे धमाकेदार गाणं सध्या सोशल  मीडियावर चांगलंच  ट्रेंड झालं आहे.   

हे धमाकेदार गाणं शार्दूल यांनी लिहिलं असून ऋचा कुलकर्णी आणि शार्दूल यांच्या दमदार आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलं आहे. वी.आर. ऋग्वेद याचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हा चित्रपट 14 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गाण्याविषयी माधुरीनं दिली प्रतिक्रिया

"हे आयटम सॉंग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल" असा विश्वास माधुरीने व्यक्त केला. माधुरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं 'रांगडा नाच' या गाण्याची झलक दिली आहे. 

हेही वाचा : 'ऐकल्यावर क्रुर वाटेल पण बाबा गेले...', वडिलांच्या अकाली निधनावर काय म्हणाली सखी!

दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला  ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, मकरंद देशपांडे,  सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर अशा अनेक कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. कथा प्रीतम एस. के. पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. रंगभूषा अभिषेक पवार यांची आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. प्रोडक्शन मॅनेजरची  जबाबदारी स्वानंद देव व विष्णू घोरपडे यांनी सांभाळली आहे.