Vijay Deverakonda आणि अनन्या पांडे लग्नबंधनात अडकणार? फोटो व्हायरल

परंतु या सगळ्यात सध्या अनन्याचा एक फोटो तिच्याच नाही तर विजय देवरकोंडाच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. 

Updated: Aug 17, 2022, 03:27 PM IST
Vijay Deverakonda आणि अनन्या पांडे लग्नबंधनात अडकणार? फोटो व्हायरल title=

Ananya Pandey and Vijay Deverakonda: अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडेचा 'लायगर' हा चित्रपट येत्या काही दिवसांतच प्रदर्शित होतोय. तेव्हा सध्या ते दोघं आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित होतो आहे त्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशन हे देशभर केले जाते आहे. नुकतेच ते दोघं 'लायगर'च्या टीमसह हैद्राबाद, पुणे, मुंबई, दिल्ली अशा प्रमुख शहरांमध्ये प्रमोशनसाठी गेले होते. 

परंतु या सगळ्यात सध्या अनन्याचा एक फोटो तिच्याच नाही तर विजय देवरकोंडाच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. या फोटोत चक्क विजय आणि अनन्या सोफ्यावर बसले आहेत आणि त्यांना दोघांना विजयची आई ओवाळताना दिसते आहे. या फोटोवरून अनेकांच्या मनातील पाल चुकचुकायला लागली आहे. आता विजय आणि अनन्या लग्नबंधनात अडकणार की काय अशा चर्चांना उधाण आले आहे. 

अनन्याने हा फोटो आपल्या इन्टाग्रामवर पोस्टवर शेअर केला आहे. ज्यात ते दोघं विजयच्या घरी हैद्राबादला आहेत. त्यांना विजयची आई औक्षण करताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनन्याचेही औक्षण विजयच्या आई करत असल्याचा एक फोटोही अनन्याने शेअर केला आहे. सासुबाई होणाऱ्या सुनेचं औक्षण करत आहेत की काय असे ते दृश्य दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी अनन्याच्या फोटोखाली 'लव्हली कपल' असे मेसेजही टाकल्याचे पाहायला मिळाले. तर काहींनी असेही लिहिले आहे की असं वाटतंय की ते दोघं लग्नच करत आहेत. 

या फोटोत विजयची आई जरी त्यांना ओवाळताना दिसत आहे पण त्यावरून लग्नाची नाही तर ही रक्षाबंधनाची तयारी आहे. विजय आणि अनन्याने यावेळी एकमेकांना राखी बांधली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा तुफान पाऊस पडतो आहे. त्या दोघांचा 'लायगर' हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले असून या चित्रपट दाक्षिणात्त्य आणि हिंदी चित्रपटाचे दिग्गज कलाकार आहेत त्याचबरोबर हॉलीवूडचे अभिनेते माईक टायसनही या चित्रपटात प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत.