मुंबई : लग्नसराईचा माहोल गेल्या बऱ्याच काळापासून कलाजगतामध्ये पाहायला मिळाला होता. राजकुमार रावपासून अगदी रणबीर आणि आलिया यांच्यापर्यंत आणि विकी- कतरिनापासून तिथं भोजपूरी कलाजगतामध्ये सुपरस्टार यशपर्यंत सर्वांनीच आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराची निवड केल्याचं पाहायला मिळालं. (Actors Honeymoon video)
काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या यशनं आता म्हणे सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं शेअर केलेला हा व्हिडीओ एकाएकी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे हा त्याच्या हनिमूनचा व्हिडीओ आहे.
आता नुसतं हनिमून म्हटलं, की अनेकांच्याच भुवया उंचावतात. पण, थांबा... नको ते विचार करण्यापूर्वी आधी हा व्हिडीओ पाहा.
यश आणि त्याची पत्नी निधी झा हे या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. जिथं ही जोडी हनिमूनचे दिवस एंजॉय करताना दिसत आहे. बरं, इथंही ही जोडी सोशल मीडियापासून दूर नाही.
यशचा व्हिडीओ पाहून हेच लक्षात येत आहे. त्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ''अकेला थोड़ी हूं मुश्किले हैं मेरे साथ'' असं यश म्हणताना दिसत आहे आणि लगेचच तो पत्नीकडे इशारा करत आहे.
यशनं हा व्हिडीओ शेअर केल्याचं पाहिल्यानंतर लगेचच निधीनं त्यावर कमेंट करत, रागीट इमोजी पोस्ट केले आहेत. आता निधीचा हा राग शांत करण्यासाठी यश काय करतो... तिची जाहीर माफी मागतो का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.