धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेता शारिरीक संबंधाच्या आहारी आणि पडला आजारी

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याचे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते. अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ    

Updated: Jan 18, 2023, 06:26 PM IST
धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेता शारिरीक संबंधाच्या आहारी आणि पडला आजारी title=

मुंबई : हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने दावा केला आहे की, एक वेळ अशी होती की त्याने इतके शारिरीक संबध ठेवले होते की, तो आजारी पडला होता. विल स्मिथने आपल्या बायोग्राफीमध्ये  हा खुलासा केला आहे. स्मिथने म्हटलं आहे की, प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो इतका तुटला होता की त्याने अनेक मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती. विलच्या आयुष्याशी निगडीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत लोकांना माहित नव्हत्या. अलीकडेच, विल स्मिथचं चरित्र पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यानंतर विल सतत चर्चेत आहे. 

विल स्मिथचे त्याच्या पुस्तकात हा धक्कादायक खुलासा केला आहे. यामध्ये त्याने त्याचं आजवरचं आयुष्य आणि त्यांचे अनुभव सांगितले आहेत. याविषयी विल स्मिथने लिहिलं आहे की, ज्या काळात मी माझ्या पहिल्या प्रेयसीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा माझे फक्त एकाच महिलेसोबत शारिरीक संबंध होते, पण ब्रेकअपनंतर मी रागाच्या भरात अनेक मुलींशी संबंध ठेवू लागलो. यामुळे मला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर झाला. अनेक वेळा सेक्स केल्यानंतर मला उलट्या व्हायच्या. 

त्याने आपल्या पुस्तकात म्हटलं आहे की, मला आराम हवा होता कारण हृदयविकारावर काही औषध नाही. विल विवाहित आहे. त्याने दोन लग्नं केली आहेत. विलने जाडा पिंकेट स्मिथशी लग्न केलं, जी सध्या विलची पत्नी आहे.

विल स्मिथ अफाट संपत्तीचा मालक आहे
आपल्या करिअरमध्ये अनेक मोठे हिट चित्रपट देणारा विल स्मिथ गेल्या 29 वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. विल स्मिथची एकूण संपत्ती सुमारे $350 दशलक्ष (रु. 2500 कोटी) आहे. 1987 मध्ये, स्मिथचा पहिला अल्बम रॉक द हाऊसला प्रचंड यश मिळालं. या अल्बमने स्मिथला केवळ प्रसिद्धीच नाही तर संपत्तीही मिळवून दिली. स्मिथ 18 वर्षांपेक्षा कमी वयातच करोडपती झाला. 

इतक्या लोकांशी संबंध का निर्माण करायचा?
विल स्मिथने सांगितलं की, त्या मुलीवरून आपलं लक्ष वळवण्यासाठी आणि डिप्रेशन टाळण्यासाठी, भरपूर शॉपिंग करण्याचा आणि अनेक मुलींशी संबंध ठेवण्याचा अवलंब केला. विल स्मिथने सांगितलं की, रिलेशनशिपमध्ये असताना तो फक्त एका मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. पण ब्रेकअपनंतर त्याने अनेक मुलींसोबत संबंध ठेवायला सुरुवात केल्यानं त्याची तब्येत बिघडली. ज्या मुलीसोबत त्याचं ब्रेकअप झालं ती फक्त 16 वर्षांची होती.