वरुण धवनचा अपघात; अभिनेत्याला गंभीर दुखापत

  अभिनेता वरुण धवन हा बॉलिवूडचा असा अभिनेता आहे जो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. हा अभिनेता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. अभिनेत्याने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होवू लागते. अभिनेत्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. 

Updated: Dec 17, 2023, 08:42 PM IST
वरुण धवनचा अपघात; अभिनेत्याला गंभीर दुखापत title=

मुंबई :  अभिनेता वरुण धवन हा बॉलिवूडचा असा अभिनेता आहे जो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. हा अभिनेता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. अभिनेत्याने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होवू लागते. अभिनेत्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मात्र आता अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा अपघात झाल्याची माहिती त्याने त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याची ही पोस्ट अवघ्या काहीवेळातच सोशल मीडियालर वाऱ्यासारखी पसरु लागली आहे. 

नुकताच वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या पायाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये वरुण खुर्चीवर पाय ठेवलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करुन त्यानं चाहत्यांना माहिती दिली आहे की, शूटिंगदरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. हा फोटो चाहत्यांसोबत शेअर करत वरुणने कॅप्शनमध्ये  लिहिलं आहे की, “सुजलेला पाय, माझा पाय लोखंडी रॉडला आदळला होता." वरुणनं इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या सुजलेल्या पायाचा फोटो शेअर केला आहे. 

वरुण हा सध्या त्याच्या 'VD 18' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. नुकताच वरुणनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याबद्दल माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. लवकरात लवकर अभिनेता बरा होवो अशी प्रार्थना त्याचे चाहते देवाकडे करत आहेत. मार्च 2024 मध्ये 'VD 18' हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल, असंही म्हटलं जात आहे. 'VD 18' हा तमिळ चित्रपट 'थेरी'चा रिमेक आहे. त्याचे चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

वरुण हा सिटाडेलच्या भारतीय व्हर्जनमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. . ज्याचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे. यामध्ये तो समंथासोबत काम करणार आहे. काही दिवसांपुर्वी वरुणचा वरुणचा  बावल हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूरसोबत झळकली होती.  हा चित्रपट 21 जुलै रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.