लग्न न करताच 'बाबा' होण्याचा निर्णय तुषार कपूरनं का घेतला?

त्याला अपयशाचाच अधिक सामना करावा लागला.   

Updated: Dec 28, 2021, 12:27 PM IST
लग्न न करताच 'बाबा' होण्याचा निर्णय तुषार कपूरनं का घेतला?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता तुषार कपूर यानं चित्रपट विश्वात पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला. विविध धाटणीचे चित्रपट त्यानं साकारले. पण, त्याला अपयशाचाच अधिक सामना करावा लागला. 

तुषार त्याच्या कारकिर्दीत अपयशी ठरला असला, तरीही वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यानं घेतलेले निर्णय आदर्श पायंडा घालून गेले. 

तुषारचा सर्वात मोठा निर्णय होता, तो म्हणजे अविवाहित राहण्याचा. पण, त्याच्या या निर्णयानं मात्र त्याची वडील होण्याची इच्छा अपूर्ण ठेवली नाही. 

लक्ष्य असं तुषारच्या मुलाचं नाव. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बाप- लेकाची जोडी आजवर सर्वांच्या भेटीला आली आहे.

आता तुम्हालाही प्रश्न पडतोय ना, की तुषारनं लग्न का केलं नाही? मुळात लग्न का केलं नाही, याचा खुलासा तुषारनं एका मुलाखतीत केला होता. 

लग्नाबाबत तुमचे काय बेत आहेत, असं विचारलं असता तुषार म्हणाला होता 'जर माझं लग्न करण्याची इच्छा असती, किंवा मी सेटल होऊ इच्छित होतो तर मी एकल पालकत्त्वाच्या या प्रक्रियेत उतरलो नसतो. 

मी वडील होण्याचा निर्णय तेव्हा घेतला, जेव्हा मी या जबाबदारीसाठी पूर्णपणे तयार होतो. माझ्या मते हा योग्य निर्णय होता. 

आजच्या क्षणाला मला प्रत्येक दिवस खास वाटतो. मुलासमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मला मिळते. या पर्यायाव्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय स्वीकारण्यासाठी मी तयार नव्हतो आणि नसेन. 

मी माझ्या भविष्याला कोणासोबतही भागीदारीत अनुभवू इच्छित नाही. शेवट गोड झाला की सर्व काही मिळवलं म्हणून समजा...', असं तो म्हणाला. 

वयाच्या 35 व्या वर्षी तुषारला आपलंही बाळ असावं असं वाटू लागलं. जीवनातील हा तोच टप्पा होता जेव्हा आपण बाळाला वेळ देऊ शकतो याची जाणीव त्याला होती. 

त्यातही स्वत:चं मूल असावं यासाठीच तो आग्रही होता, अखेर त्यानं सरोगसीचा निर्णय घेत लक्ष्यची जबाबदारी घेतली. 

प्रसिद्धीसाठी मला हे सर्व कधीच करायचं नव्हतं असं सांगत आपल्या निर्णय़ावर आपण नेमकं किती ठाम होतो, हे त्यानं स्पष्ट केलं.