दीपिका पदुकोणला बघताच 'त्यांचा' ताबा सुटला, सगळ्यांसमोर केलं असं कृत्य....

भररस्त्यात घडला दीपिकासोबत धक्कादायक प्रकार 

Updated: Dec 28, 2021, 10:32 AM IST
दीपिका पदुकोणला बघताच 'त्यांचा' ताबा सुटला, सगळ्यांसमोर केलं असं कृत्य....  title=

मुंबई : दीपिका पदुकोण (Deepika Padukone) जिथे पण जाते तिथे चाहत्यांची गर्दीही असतेच. अभिनेत्रीचा स्टारडम खूप मोठा आहे. एका उत्तम खेळाडूची मुलगी आणि उत्कृष्ठ खेळाडूची पत्नी असलेली पत्नी खूप चर्चेत असते. दीपिका पदुकोणसोबत एक धक्कादायक प्रकार घडलाय. 

दीपिका पदुकोण रेस्टॉरंटमधून बाहेर आली. तेव्हा गर्दी बघून ती खूप घाबरली. मात्र या गर्दीने दीपिकासोबत जे केलं त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला. 

दीपिकाची फॅन फॉलोइंग 

दीपिका पदुकोण अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी दिसत असते. हल्लीच तिचा "83''  सिनेमा प्रदर्शित झाला. ज्यामध्ये तिने कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. 

दीपिका सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे कायमच चर्चेत असते. एका ठिकाणी असा प्रसंग घडला की, दीपिका हैराणच झाली. तिला खूर मोठा धक्का बसला. 

चाहत्यांनी दीपिकाला घेरलं 

या वर्षी फेब्रुवारीमध्ये चित्रपटाचे शूटिंग संपवून दीपिका मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आलेली दीपिका जेव्हा रेस्टॉरंटमधून बाहेर पडली आणि चाहत्यांना सामोरे गेली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. तिथे उपस्थित असलेल्या पापाराझीने हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला. 

दीपिकाची बॅग खेचली 

अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत एक अशी घटना घडली, ज्याची स्वतः अभिनेत्रीने कल्पनाही केली नसेल. खरं तर, जेव्हा अभिनेत्री रेस्टॉरंटमधून बाहेर आली तेव्हा तिच्या अनेक चाहत्यांनी तिला घेरले.

दीपिकाचे अंगरक्षक तिथे उपस्थित असले तरी ते अभिनेत्रीला कव्हर करत होते. दरम्यान, गर्दीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दीपिकाला तिची बॅग ओढून रोखण्याचा प्रयत्न केला.

अचानक घडलेल्या या घटनेने दीपिकाला धक्का बसला आणि तिने यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे तिला समजले नाही.