'माझ्या पतीच्या...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नी दिप्तीची हात जोडून विनंती

Shreyas Talpade Heart Attack Wife Comment : श्रेयस तळपदे हे नाव मराठी आणि बॉलिवूडसाठी नवीन नाही. श्रेयसने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 15, 2023, 04:40 PM IST
'माझ्या पतीच्या...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नी दिप्तीची हात जोडून विनंती title=
पत्नीने सोशल मीडियावरुन नोंदवली प्रतिक्रिया

Shreyas Talpade Heart Attack Wife Comment : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी सायंकाळी अंधेरीतील बेलव्यू रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. श्रेयस तळपदेला गुरुवारी रात्री अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाच्या शुटींगनंतर घरी आल्यावर श्रेयसला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला ततडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. श्रेयसची प्रकृती सध्या स्थीर असल्याची माहिती समोर आली आहे. अशाचत या संपूर्ण प्रकरणानंतर श्रेयसची पत्नी दिप्ती तळपदेने सोशल मीडियावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

काय म्हणाली दिप्ती?

दिप्तीने सोशल मीडियावर नमस्कार करतानाचा इमोजी वापरुन एक इमेज पोस्ट केली आहे. दिप्तीने आपल्या भावना व्यक्त करताना पोस्टमध्ये श्रेयसच्या प्रकृतीसंदर्भातील समस्येनंतर त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करणाऱ्या, विचारपूस करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. "माझ्या पतीच्या आरोग्यासंदर्भातील घडामोडीनंतर ज्यांनी ज्यांनी काळजी व्यक्त केली आणि त्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी आभार मानते. मला सर्वांना हे सांगताना समाधान वाटत आहे की आता त्याची (श्रेयसची) प्रकृती स्थीर आहे. त्याला काही दिवसांमध्ये रुग्णालयातून घरी सोडलं जाईल.

तुमचा आधार वाटतोय

दिप्तीने रुग्णालयामध्ये श्रेयसची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही आभार मानले आहेत. "रुग्णलयामधील मेडिकल टीमने घेतलेली काळजी आणि वेळीच दिलेल्या प्रतिसादाचा या कठीण काळामध्ये फार फायदा झाले. त्यांच्या मदतीसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत," असा उल्लेख दिप्तीच्या या पोस्टमध्ये आहे.

चाहत्यांना विनंती

प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्राच्या शेवटी दिप्तीने आता सर्वांनी श्रेयस आणि त्यांच्या कुटुंबाची प्रायव्हसी जपावी अशी विनंती केली आहे. "त्याची (श्रेयसची) रिकव्हरी सुरु असल्याने आमच्या खासगीपणाचा तुम्ही सर्वजण आदर कराल अशी अपेक्षा आहे. तुमच्या पाठिंब्याचा आम्हाला दोघांनाही फार आधार वाटतोय," असंही दिप्तीने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

अनेक चित्रपटांमध्ये केलं काम

श्रेयस तळपदे हे नाव मराठी आणि बॉलिवूडसाठी नवीन नाही. श्रेयसने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'इकबाल' चित्रपटातून श्रेयसने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नसरुद्दीन शाह यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करतनाही श्रेयसने त्याच्या पहिल्याच चित्रपटात सर्वांचं लक्ष आपल्या अभिनयाने वेधून घेतलं. या चित्रपटाचं समीक्षकांनीही कौतुक केलं होतं. तसंच 'डोर', 'ओम शांती ओम', 'वेलकम टू सज्जनपूर', 'हाऊसफूल 2', 'गोलमाल' अशा अनेक चित्रपटांमध्ये श्रेयसने अभिनय केला. 2019 मध्ये श्रेयसने फिरकीपटून प्रवीण तांबेच्या आयुष्यावरील 'कौन प्रवीण तांबे' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.

मराठीतही उत्तम कामगिरी

श्रेयस तळपदेने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये 'पोस्टर बॉईज'सह अनेक मराठी चित्रपटांचीही निर्मितीही केली आहे. 'बाजी', 'बायो', 'सनई चौघडे', 'सावरखेड एक गाव', 'पछाडलेला' आणि 'आपडी थापडी' या चित्रपटांमधील श्रेयसच्या भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहेत. 2021 मधील सुपरहिट चित्रपट 'पुष्पा: द राइज'च्या हिंदी डब्ड व्हर्जनमध्ये श्रेयसने अल्लू अर्जुनच्या पात्राला आवाज दिला होता. 'एमर्जन्सी' चित्रपटातही श्रेयस लवकरच दिसणार आहे.