मुंबई : बॉलीवूड अभिनेता संदीप नाहरने आत्महत्या (Actor Sandip Nahar Sucide) करुन आपली जीवनयात्रा संपवली. आपली पत्नी आणि सासूमुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं. आत्महत्या करण्याआधी त्याने फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करुन आपल्या परिजनांसोबत जवळच्यांना माहिती दिली.
संदीप गोरेगावमध्ये राहायचा. त्याने आपल्या सासू आणि पत्नीला आपल्या मृत्यूस जबाबदार धरलंय. सुसाईड नोटमध्ये (Sucide Note) त्यांनी लिहिले आहे की, 'आता जगण्याची इच्छा नाही. आयुष्यात खूप आनंद आणि दुःख पाहीलं. प्रत्येक समस्येचा सामना केला. परंतु आज मी ज्या आघातातून जात आहे, ते सहन करण्याच्या पलीकडे आहे.
मला माहित आहे की, आत्महत्या ही भ्याडपणा आहे. पण जिथे शांतता आणि स्वाभिमान नाही तसं आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे ? माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई वीणू शर्मा ज्यांना समजले नाही किंवा त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. माझी पत्नी जास्त भडकू स्वभावाची आहे. तिचे व्यक्तीमत्व वेगळं आहे.
'मी खूप आधी आत्महत्या केली असती, परंतु मी आणखी काही काळ थांबलो. मला वाटलं की परिस्थिती सुधारेल पण तसं झालं नाही. मी कुठे जाऊ शकतं नाही. मी उचललेल्या पाऊलाचा काय परिणाम होईल ? हे मला नाही माहित. मी नरक यातनेतून जात आहे. माझी विनंती आहे की, मी गेल्यानंतर कांचनला (त्याच्या पत्नीला) काहीही बोलू नये, परंतु तिच्यावर उपचार करा.'
आत्महत्येचा तीन तास आधी त्याने हा व्हिडीओ बनवल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला ? हे समजण्यासाठी शवविच्छेदन अहवालची वाट पाहत असल्याचे पोलीस म्हणाले.
संदीप नाहरने सुशांत सिह राजपूतचा सिनेमा 'MS Dhoni: The Untold Story' मध्ये काम केलंय. तो अक्षय कुमारसोबत 'केसरी' मध्ये देखील दिसला होता. त्याने आणखी काही सिरियल्स आणि सिनेमांमध्ये काम केलंय. कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचे त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.