मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील लॉबींग आणि नेपोटीझमवर चर्चा होतेय. सुशांतसारख्या अभिनेत्यांना संधी नाकारणारे प्रोडक्शन हाऊस, अभिनेते प्रेक्षकांच्या रडारवर आहेत. सुशांतच्या बाबतीत भावूक झालेल्यांवर अभिनेता सैफ अली खान भडकलाय.
सुशांतचे जाणं खूप भयावह आणि दु:खद आहे. पण स्वत:चा फायदा बघून काहीजण यावर राजकारण करतायत ते चुकीचे आहे. यावर वायफळ चर्चा करणे, सुशांतप्रती प्रेम दाखवणे हा दिखावा आहे. या शिवाय जो गेलाय त्यासाठी शांत राहायला हवं. अशाने आपल्या बोलण्याने त्याच्या आत्म्याला दु:ख पोहोचणार नाही.
बॉलीवूडमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. इथे लोकं कोणाची परवा करत नाहीत. प्रेम दाखवणे हे ढोंग आहे. सुशांतच्या मृत्यूला अनेकांना जबाबदार धरणाऱ्यांवर देखील सैफने निशाणा साधलाय. खरं कारण काय आहे ? हे आपल्याला माहीती नाही. त्यामुळे कोणाला दोषी ठरवणे चुकीचे आहे. एखादी व्यक्ती आपल्या प्रोफेशनल लाईफमुळेच दु:खी असते असं नाही. त्याच्या वैयक्तीक आयुष्यात काही अडचणी असू शकतात असेही सैफ म्हणाला.
जब से यह वीडियो आया है,हतप्रभ हूँ! मनोरंजन के नाम पर ऐसा वीभत्स रंग!
एंकरिग के नाम पर बड़े कलाकारों द्वारा अवार्डसेरेमनी में इस तरह नवोदित अभिनेता #SushantSingh को अपमानित करना, यह किस नज़रिये से स्वीकार्य है?@iamsrk @shahidkapoor pic.twitter.com/Ak32n1VVi6— मालिनी अवस्थी (@maliniawasthi) June 15, 2020
आयफा अवॉर्डमधला सुशांत सिंह राजपूतचा एक व्हिडीओ देखील या दरम्यान शेअर होतोय. ज्यामध्ये शाहीद कपूर आणि शाहरुख खान मिळून सुशांत सिंह राजपूतची खिल्ली उडवताना दिसतायत. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियात चर्चेत आहे.