मुंबई : 'सिम्बा', 'गली बॉय' या सिनेमांनंतर प्रकाशझोतात आलेला अभिनेता रणवीर सिंग नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटला आहे. या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रणवीरमध्ये अनेक विषयांवर चर्चा रंगली. पंतप्रधान मोदींनी बॉलिवूडच्या तरूणांना भारताच्या एकतेवर आधारित सिनेमे तयार करण्याचा सल्ला दिला. वर्षाच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल आयुष्मान खुराना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते.
रणवीरने सांगितले, 'मी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो. आमची ही भेट कधीही न विसरणारी आहे. आम्ही त्यांना बॉलिवूडमधील युवा कलाकार कशा प्रकारे काम कारतात याची माहिती दिली.' त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या एकतेवर भर देण्याचे आवाहन केले. सोमवारी झालेल्या ६४ व्या फिल्मफेअर सोहळ्याच्या वेळेस रणवीरने वक्तव्य केले.
रणवीर सध्या त्याचा आगामी सिनेमा '83' च्या शूटिंग मध्ये व्यग्र आहे. भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्व चषक स्पर्धेत बाजी मारत भारताचे नाव इतिहासात कोरले होते. सिनेमात अभिनेता रणवीर सिंग माजी क्रिकेटर कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.