मुंबई : अभिनेता राजकुमार रावसाठी यंदाच 2018 हे वर्ष अगदी खास राहिलं आहे. कारण यावर्षी राजकुमार रावचे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. या सिनेमांकरता त्याचं भरपूर कौतुक करण्यात आलं.
टेररिस्ट ड्रामा 'ओमेर्टा', ऐश्वर्या रायसोबत 'फन्ने खान', नरगिस फाखरीसोबत '5 वेडिंग्स'सोबतच हॉरर सिनेमा 'स्त्री' यासारखे सिनेमांनी खूप यश कमावलं. यासोबतच 'मेंटल है क्या', 'तुर्रम खान' आणि 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' सारख्या सिनेमात राजकुमार राव दिसणार आहे.
म्हणजे 2018 प्रमाणेच 2019 हे वर्ष देखील राजकुमार राव आपल्या कामात व्यस्त असणार आहे. त्यामुळे अगदी वर्ष सरता सरता त्याने हा क्षण आराम करायचा ठरवला आहे.
राजकुमार राव लांब सुट्यांवर गेला आहे. ते देखील आपली गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत. राजकुमार राव आणि पत्रलेखा थर्टी फर्स्ट लंडनमध्ये साजरा करणार आहे. राजकुमार आपल्या नवं वर्षाचं स्वागत लंडनमध्ये करणार आहे.
नुकताच राजकुमार रावला 'स्त्री' करता उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. नवीन वर्षाचं स्वागत केल्यानंतर राजकुमार राव 'तुर्रम खान' या सिनेमाचं शुटिंग करणार आहे.
आता अशी माहिती देखील मिळाली आहे की, 'स्त्री'नंतर राजकुमार रावने आणखी एक हॉरर कॉमेडी सिनेमा साइन केला आहे. या सिनेमाचं नाव 'मेड इन चायना' आणि दिनेश विझन प्रोड्यूस करणार आहे. या सिनेमात मोनी रॉय आणि बोमन ईरानी असणार आहे.