'तुमचे चित्रपट पाहून मोठा झालो', पापाराझीच्या वक्तव्यावर आर. माधवनने दिलं मजेदार उत्तर, Video व्हायरल

सोशल मीडियावर अभिनेता आर. माधवनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पापाराझींसोबत मस्त गप्पा मारताना दिसत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 25, 2024, 07:36 PM IST
'तुमचे चित्रपट पाहून मोठा झालो', पापाराझीच्या वक्तव्यावर आर. माधवनने दिलं मजेदार उत्तर, Video व्हायरल title=

R Madhavan: अभिनेता आर. माधवनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आर. माधवन सोशल मीडिया आणि चाहत्यांना नेहमी अतिशय नम्रपणे भेटतो आणि बोलतो. विनोद करण्याची एकही संधी तो कधी सोडत नाही. असच काहीसे सध्या बघायला मिळाले आहे. पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये आर. माधवनला कैद करण्यात आलं आहे. यादरम्यान एक पापाराझी आर. माधवनला म्हणाला की, मी तुमचे चित्रपट पाहून मोठा झालो आहे. यावर आर. माधवनने खूप मजेशीर उत्तर दिले आहे. त्यानंतर स्वत: ते हसायला लागले. एवढच नाही तर आर. माधवनने तिथेच थांबून पापाराझींना वेगवेगळ्या पोज देखील दिल्या. 

आर. माधवन नेमकं काय म्हणाला? 

आर. माधवनचा हा व्हायरल व्हिडीओ Viral Bhayani ने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये पापाराझींनी त्याला सांगितले की, मी तुमचे चित्रपट पाहून मोठा झाला आहे. त्यावर आर. माधवन म्हणाला की, यार, तू काय बोलत आहेस'. मला वाटले आई-वडिलांनी मोठे केले आहे'. यानंतर तो हसला. त्यानंतर आर. माधवनने पापाराझींना वेगवेगळ्या पोज दिल्या आहे. पुन्हा एकदा हटके स्टाईलने अभिनेत्याने चाहत्यांनी मने जिंकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आर.माधवन रणवीर सिंहसोबत दिसणार 

आर. माधवनच्या लुकची चाहते प्रचंड कौतुक करत आहेत. एका चाहत्याने म्हटलं आहे की, भावा, तू इतका जवान कसा दिसत आहेस. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे की, त्याचे वय वाढण्याऐवजी कमी होत चालले आहे. अशा वेगवेगळ्या कमेंट्स चाहत्यांनी त्याच्या या व्हिडीओर केल्या आहेत. आर. माधवनचा आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो आदित्य धर यांच्या दिग्दर्शित चित्रपटामध्ये दिसणार आहे.  ज्यामध्ये संजय दत्त, रणवीर सिंह, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल सारखे कलाकार यामध्ये दिसणार आहेत. 

आर. माधवनने नाकारली पान मसाला जाहिरात 

आर. माधवन त्याच्या अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या नैतिक मूल्यांसाठी देखील ओळखला जातो. अलीकडेच त्याला पान मसाल्याच्या जाहिरातीची ऑफर आली होती. मात्र, अभिनेत्याने ती नाकारली. त्यानंतर चाहत्यांनी देखील त्याचे कौतुक केले. कारण पान मसाला सारख्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांच्या कराराला अभिनेत्याने नकार दिला होता.