'मालगुडी डेज' मधल्या स्वामीला पाहिलंत का? आज करतोय 'हे' काम

Malgudi Days Swami :  'मालगुडी डेज' मध्ये स्वामीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला पाहिलंत का? फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का. आज करतोय हे काम

दिक्षा पाटील | Updated: Dec 16, 2023, 07:10 PM IST
'मालगुडी डेज' मधल्या स्वामीला पाहिलंत का? आज करतोय 'हे' काम title=
(Photo Credit : Social Media)

Malgudi Days Swami :  तुम्ही जर ऐंशी नव्वदीच्या काळात जन्मला असाल, तर मालगुडी डेज बद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. आर.के.नारायण यांचा 'मालगुडी डेज' या पूस्तकावर आधारित असलेली ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. मालगुडीचं ते लहानसं गाव आणि तिथे घडणाऱ्या स्वामी, त्यांचा मित्राचा गमती जमती आणि बालपणीचं दिवस आठवून अनेकांनीच आपलं बालपणही त्याच्याशी जोडी पाहिलं होतं. 'मालगुडी डेज' ही एक भारतीय टेलिव्हिजनवरची सर्वात लोकप्रिय मालिका आहे जी 1986 मध्ये प्रदर्शित झाली. ही मालिका लोकप्रिय लेखक आर.के. हा नारायण यांच्या कादंबरीबवर आधारित असून शंकर नाग यांनी दिग्दर्शित केली होती. ही मालिका 1986 मध्ये दूरदर्शनवर टेलिकास्ट झाली होती. मात्र, आजही 'मालगुडी डेज' ही मालिका युट्युबवर पाहिली जाते. 

ही मालिका मालगुडी या गावातील विविध पात्रांचा जीवनप्रवास दाखवते. मानवी भावना, संघर्ष आणि आनंद यांची उत्तम मांडणी आणि या सगळ्याचं रहस्य आहे. 'मालगुडी डेज' च्या मुख्य पात्रांपैकी एक म्हणजे स्वामी, ज्याची भूमिका अभिनेता मंजुनाथ नायकरने साकारली होती. स्वामीचे पात्र हे एका जिज्ञासू मुलाचे आहे. स्वामी धोतर, झब्बा, टोपी, हातात पाटी, पिशवी, शाळेचं दप्तर अशा एकंदर रुपात सर्वांसमोर यायचा. मंजुनाथ नायकरनं बालकलाकार म्हणून तब्बल 68 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यात अमिताभ बच्चन यांच्या 'अग्निपथ' मधील भूमिकेचा समावेश आहे, जिथे त्यांनी विजय दीनानाथ चौहान यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. मात्र, इतकी लोकप्रियता असूनही ते अचानक  गायब झाले, ते  कुठे गेले आणि नंतर ते का दिसले नाही असा प्रश्न त्यांचा चाहत्याना पडला होता.

एका काश्मिरी चित्रपटात काम केल्यानंतर वयाच्या 19 वर्षी वय मंजूनाथ यांनी चित्रपटसृष्टीतून सन्यास घेत अभिनय सोडून शिक्षणाकडे लक्ष दिले. त्यानंतर मैसूर विश्वविद्यालयातून इंग्रजीतून आणि समाजशास्त्रातून पदवी मिळवल्यानंतर मंजूनाथ यांनी पब्लिक रिलेशन प्रोफेशनल म्हणून काम सुरु केले. त्यानंतर त्यांनी सिनेमटोग्राफीमध्ये एक डिप्लोमाही मिळवला. मात्र, फिल्मी दुनियेकडे काही ते वळले नाही. सध्या ते नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडोर इंटरप्रायजेससोबत काम करत आहेत आणि बेंगळुरूच्या व्हिआयसी लि. मध्ये प्रिन्सिपल कन्सलटेन्ट म्हणूनही काम करतात. 

हेही वाचा : तू मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवलेत का? प्रश्न ऐकताच रणबीरनं केला अर्जुनला किस, म्हणाला...

मंजुनाथ यांनी काही वर्षांपूर्वी लॉन्ग जम्प आणि रनिंग ऍथलिट स्वर्णरेखा हिच्याशी त्यांनी लग्न केले आहे.  मास्टर मंजुनाथ सध्या त्यांच्या कुटुंबासमवेत बंगळुरू येथे स्थायिक आहेत. मास्टर मंजूनाथ यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून अभिनय करायला सुरुवात केली होती. तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये यश मिळूनही लोक अजूनही 'मालगुडी डेज' मधून त्यांना स्वामी म्हणून ओळखतात. पुढे स्वामी यांनी स्वर्णरेखा नावाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि दोघांना एक 5 वर्षांचा मुलगाही आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एक असाही माणूस आहे जो आपल्या बालपणी लोकप्रियतेच्या यशोशिखरावर पोहोचूनही त्या झगमगत्या दुनियेतून बाहेर आलाय. आज तो एक सामान्य जीवन जगत आहे.