घटस्फोटानंतर हृतिकच्या आयुष्यात सबाची एन्ट्री, थेट लंडनमधून 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ

कंगना राणावतसोबतच्या त्याच्या अफेअरमुळे तो चांगला चर्चेत आला होता.

Updated: Jul 17, 2022, 04:21 PM IST
घटस्फोटानंतर हृतिकच्या आयुष्यात सबाची एन्ट्री, थेट लंडनमधून 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ title=

मुंबईः गेली अनेक वर्षे लोकप्रिय अभिनेता ऋतिक रोशन आपल्या लव्ह अफेअर्समुळे चर्चेत आहे. आठ वर्षांपुर्वी सुझान खानसोबत ऋतिक रोशनचा डिवोर्स झाला. त्यानंतर कंगना राणावतसोबतच्या त्याच्या अफेअरमुळे तो चांगला चर्चेत आला होता. त्यावेळी कंगनानेही त्याच्यावर आरोप केले होते. ज्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपचे पुढे फारसे काहीच झालं नव्हतं. 

कंगनासोबत तुटलेल्या रिलेशनशिपमुळे मात्र तो बराच काळ पडद्यामागे होता आणि त्यातून फारच कमीवेेळा तो मीडियासमोर येत होतो त्यानंतर त्याचे बरेच चित्रपट येऊनही तो फार काही लाईमलाईटमध्ये दिसला नव्हता त्याऊलट तो आपल्या दोन मुलांसमवेत आनंद व्यतित करताना दिसत होता. 

आता ऋतिकची सगळीकडेच भरपुर चर्चा आहे आणि विशेषतः आता जो ज्या गोष्टीमुळे चर्चेत आहे ते कारण फारच खास आहे. सध्या तो त्याच्या मुलांसोबत फारसा कुठे फिरायला जाताना दिसत नाहीये तर तो आता चक्क अभिनेत्री सबा आझादला डेट करतो आहे. त्यामुळे मध्यतंरी गायब झालेला ऋतिक आता चांगलाच चर्चेत आला आहे. 

सबा आझाद ही एक बॉलीवूड अभिनेत्री आहे आणि नुकताच तिचा 'रॉकेट बॉईझ' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सबा आझाद आणि हृतिक रोशनचा एक रॉमेटिंक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सध्या ते दोघंही लंडनमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहेत आणि सबाने त्या दोघांच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. दोघेही लंडन येथील जाझ क्लबला जाऊन आले. 

त्या क्लबमध्ये दोघेही ड्रिंक करत आहेत. ऋतिकने तिचा ड्रींक आणि जॅझ परफॉर्मन्स एन्जॉय करतानाच व्हिडीओ शूट केला आहे तसेच ते दोघंही एकमेकांच्या गळ्यात हात घालताना दिसत आहेत. नुकतेच दोघंजण करन जोहरच्या पन्नासाव्या वाढदिवशी एकत्र स्पॉट झाले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हृतिक लवकरच सैफ अली खान आणि राधिका आपटेसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. ३० सप्टेंबरला त्यांचा हा नवा चित्रपट रिलिज होणार आहे. लंडनला जाण्याअगोदर  जाण्यापूर्वी हृतिकने 'विक्रम'चे चित्रीकरण पूर्ण केले. सिद्धार्थ आनंदच्या 'फायटर'मध्ये तो पहिल्यांदा दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे तसेच तो क्रिश 4 मध्येही दिसणार आहे.