महिला खासदाराचे बेडरूममधील फोटो; बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार

महिला खासदाराचे बेडरूममधील फोटो, फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चा  

Updated: Jul 17, 2022, 04:08 PM IST
महिला खासदाराचे बेडरूममधील फोटो; बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार title=

मुंबई : बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या खासदार नुसरत जहां गेल्या काही दिवसांपासून लग्न आणि प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. या सर्व वादातही नुसरत जहां त्यांच्या चाहत्यांना निराश करत नाही. ती सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असतात आणि त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान, नुसरत जहां पुन्हा एकदा आपले काही फोटो शेअर करत सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.

आता इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर टॉप घातला आहे. बेडरुममधील फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'From another point of view' असं लिहिलं आहे. सध्या नुसरत यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सांगायचं झालं तर, नुसरत यांचे  वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात राहिले आहे. त्यांचं पहिलं लग्न 2019 मध्ये तुर्कीतील बिझनेसमन निखिल जैनसोबत झालं होतं. पण 2020 मध्ये दोघे वेगळे राहू लागले. दरम्यान, नुसरत गरोदर असल्याची बातमी आली आणि निखिलने सांगितले की, हे मूल त्याचे नाही. 

यानंतर नुसरतचे नाव यश दासगुप्तासोबत जोडले जाऊ लागले. 2021 मध्ये ऑगस्टमध्ये नुसरत यांनी इशान या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावर यशचे नाव लिहिले होते. याशिवाय यशच्या वाढदिवशी नुसरत यांनी केकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी यशला पती आणि मुलाचा पिता असल्याचे सांगितलं.