मुंबई : कोरोना महामारीच्या दरम्यान, सेलिब्रिटी पीडितांना सर्वतोपरी मदत करीत आहेत. अशा परिस्थितीत कन्नड अभिनेता अर्जुन गौडा देखील मदतीसाठी पुढे आला आहे जो रुग्णवाहिका चालक बनून लोकांना मदत करत आहे. साऊथच्या युवराथना आणि रुस्तम या चित्रपटात काम करणारा अर्जुन प्रोजेक्ट स्माईल ट्रस्ट अंतर्गत गरजूंना मदत करत आहेत. लोकांना रुग्णालयात नेणं तसेच कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्मशानभूमीतून अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन जात असल्याचेही अर्जुनने सांगितले आहे.
आतापर्यंत 6 जणांवर अंत्यसंस्कार
अर्जुन म्हणाला की, ज्या लोकांना रूग्णालयात जाण्यासाठी किंवा अंत्यसंस्कारासाठी गाडीची आवश्यकता असते त्यांना रुग्णवाहिका सेवेसाठी मदत केली जाते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अर्जुन म्हणाला की, मी बरेच दिवस रस्त्यावर आहे आणि जवळपास 6 लोकांवर अंत्यसंस्कार देखील केले आहेत. आम्ही याची काळजी घेत आहोत की आम्ही कुठे ही असो किंवा कुठल्याही धर्माची गरजू व्यक्ती असो. त्यांना मदत करतो. मी शहरभर कुठेही जायला तयार आहे.'
अर्जुन म्हणाला की, 'अलीकडेच मी एका गरजू व्यक्तीला केंगेरीपासून खूप दूर असलेल्या व्हाइटफिल्ड हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पुढील काही महिने मी गरजुंना मदत करणे चालूच ठेवणार आहे, कारण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ज्यांना ऑक्सिजन आवश्यक आहे त्यांना ऑक्सिजन देत आहोत'
अर्जुनच नाही तर बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.