मुंबई : 'वांटेड', 'मुन्ना मायकल', 'रक्तचरित्र' आणि 'स्लमडॉग मिलियनेअर' सह अनेक लोकप्रिय टीव्ही शो चा भाग असलेले अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे वयाच्या 63 व्या वर्षी 8 ऑगस्ट रोजी निधन झाले.
अभिनेत्याला 6 दिवसांपूर्वी गोरेगाव येथील एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, जेव्हा त्यांची प्रकृती गंभीर झाली होती, तेथे त्यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. यावेळी अभिनेत्याचे अनेक अवयव निकामी झाल्याचं ही बोललं जात होतं.
अनुपम श्यामचा भाऊ अनुराग श्यामने एका मुलाखतीत सांगितले की, आमिर खानने त्याच्या भावाच्या उपचाराचे आश्वासन दिले होते. पण नंतर पुन्हा त्याने फोन उचलणे बंद केले. अनुराग श्याम म्हणाला, आमचे कुटुंब खूप वाईट काळातून गेले. गेल्या महिन्यात माझ्या आईचे निधन झाले. अनुपम आपल्या आईच्या मृत्यूनंतर प्रतापगढला जाऊ शकला नाही याचे खूप दुःख झाले. वास्तविक, प्रतापगढमध्ये डायलिसिस केंद्र नाही, त्यामुळे अनुपमला तिथे नेणे खूप जोखमीचे ठरले असते.
प्रतापगढमध्ये डायलिसिस सेंटरची व्यवस्था करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. अगदी अनुपम आमिर खानसोबत देखील बोलला. आमिरने प्रतापगढमध्ये डायलिसिस सेंटरची व्यवस्था करू असे आश्वासन दिले,पण काही महिन्यांनी त्याने फोन उचलणे बंद केले.
अनुराग श्याम पुढे म्हणाले, 'अनुपम देखील खूप दुःखी होता की, लवकरच त्याचा शो मन की आवाज प्रतिज्ञा 2 बंद होणार आहे. अनुपम शेवटच्या दिवसांपर्यंत या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. त्याच्या भावाच्या म्हणण्यानुसार, शूटिंग दरम्यान जास्त मद्यपान केल्यामुळे त्याची तब्येत बिघडली आणि ज्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथेच त्यांचे निधन झाले.