फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारचा नवीन चित्रपट, इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ; वाढदिवसाच्या दिवशी करणार घोषणा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा वाढदिवस येत आहे आणि त्यानिमित्त तो एक मोठी घोषणा करणार आहे. ही घोषणा त्याच्या आगामी चित्रपटाशी संबंधित असेल. सध्या अभिनेत्याने एक इशारा दिला आहे. काय आहे तो इशारा? जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 7, 2024, 07:15 PM IST
फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारचा नवीन चित्रपट, इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ; वाढदिवसाच्या दिवशी करणार घोषणा title=

Akshay Kumar New Movie: बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर त्याच्या नवीन प्रोजेक्ट्सचे संकेत दिले आहेत. त्याने सोशल मीडिया पोस्टवर त्याच्या आगामी चित्रपटाची पहिली झलक दाखवली आहे. ज्याने सर्व चाहते थक्क झाले आहेत. अक्षय कुमार मागील काही काळापासून त्याच्या बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

अक्षय कुमारने शनिवारी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये राक्षसाचा चेहरा दिसत आहे. जो पाहून कोणीही घाबरून जाईल. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'गणपती बाप्पा मोरया', आजच्यापेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो. जेव्हा तुम्ही काहीतरी खास घडण्याचा इशारा देता. ते माझ्या वाढदिवशी उघड होईल. म्हणजेच 9 सप्टेंबरला अक्षय कुमारच्या वाढदिवशी तो कोणती मोठी गोष्ट घेऊन येणार आहे याचं रहस्य उलगडणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सोशल मीडियावर चाहते लावत आहेत अंदाज

अक्षय कुमारेने शेअर केलेली पोस्ट पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की अक्षय कुमार आणि प्रियदर्शनचा हा नवीन प्रोजेक्ट आहे का? दोघे एका हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी एकत्र येत असल्याच्याही अफवा पसरवल्या जात आहेत. अक्षय कुमारने 'भूल भुलैया' या प्रसिद्ध चित्रपटात काम केलं आहे. 

अक्षय कुमारचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष 

अक्षय कुमारने शेअर केलेला टीझरचा भयानक लोगो या गोष्टींना समर्थन देत आहे. जे सुपरस्टारसाठी हॉरर चित्रपटांमध्ये परत येण्याची शक्यता दर्शवत आहे. तथापि, त्याचे नाव आणि कलाकारांबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. गेल्या 2 वर्षात अक्षय कुमारचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. त्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहे.