रातोरात स्टार झालेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं? संघर्षापासून स्टार होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना इंडस्ट्रीत आपला ठसा उमठवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये लहान भूमिका केल्यानंतर एका अश्या चित्रपटामुळे त्याचा आयुष्याला एकदम वळण मिळाले की तो रातोरात स्टार झाला. या अभिनेत्याने मोठ्या संघर्षाने आणि धैर्याने आपला ठसा इंडस्ट्रीत उमठवला.

- | Updated: Dec 30, 2024, 02:07 PM IST
रातोरात स्टार झालेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं? संघर्षापासून स्टार होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा  title=

अभय वर्मा, ज्याने बॉलिवूडमध्ये 6 वर्षांपूर्वी पाऊल ठेवले होते. त्याच्या करिअरची सुरुवात काही खास नव्हती. त्याने हृतिक रोशनचा सुपरहिट चित्रपट 'सुपर 30'मध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केले. यानंतर तो 'फॅमिली मॅन' वेब सीरिजमध्ये देखील दिसला. पण त्याला मोठी ओळख मिळाली ती 'मुंज्या' चित्रपटामुळे. याच चित्रपटाने त्याच्या करिअरला एक नवी दिशा दिली आणि रातोरात तो इंडस्ट्रीतील एक चर्चित चेहरा बनला.

अभयने आपल्या संघर्षपूर्ण प्रवासाबद्दल एका मुलाखतीत सांगितले, 'पूर्वी मला इंडस्ट्रीत फारशी ओळख नव्हती, पण आता लोक माझ्याकडे एक कलाकार म्हणून बघू लागले आहेत. यश मिळाल्यानंतर अचानक तुमची स्वाक्षरी ऑटोग्राफ बनते, लोक तुमचे चाहते होतात. यावर विश्वास ठेवणे आणि समजून घेणे फार कठीण होते, पण आता हे सर्व प्रत्यक्षात घडतेय आणि ते खूप चांगले वाटत आहे.' 

अभय वर्मा याने 'मुंज्या' चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना म्हटले, 'हे खूपच खास आहे. माझ्या खात्यात फक्त 1200 रुपये होते आणि चित्रपट रिलीज होण्याच्या तीन दिवस आधी माझ्या स्थितीचा विचार करता, मी खूपच घाबरलो होतो. मी माझ्या मित्राला फोन केला आणि विचारलं की, हे कसं होईल? पण सर्व काही व्यवस्थित झालं. 'मुंज्या' चित्रपटाने माझ्या जीवनाला एक नवा मोड दिला आहे.'

'मुंज्या' चित्रपटाच्या यशामुळे अभय वर्माला 2024 मध्ये हिंदी चित्रपटांच्या 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळाले. यामध्ये कोणताही मोठ्या अभिनेत्याचा चेहरा नसताना, केवळ अभयच्या दमदार अभिनयामुळे या चित्रपटाने एवढं मोठं यश मिळालं. अभय म्हणाला, 'हे जे घडत आहे, ते प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आहे. 'मुंज्या'च्या यशाने मला आत्मविश्वास दिला आहे आणि त्यामुळे मला यशस्वी होण्याची खरी भावना समजली आहे.'

हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/she-played-first-as-gran...

अभय वर्माच्या यशाची कथा ही एक प्रेरणा आहे. त्याने आपल्या संघर्षाची आणि प्रगतीची खरी भावना सांगितली आहे. त्याच्या शब्दांत, 'इंडस्ट्रीमध्ये स्वीकारले जाणे ही एक मोठी गोष्ट आहे. आता लोक मला कलाकार म्हणून पाहतात आणि हे खूप खास आहे.' त्याच्या या प्रवासाला एक ठोस दिशा दिली आहे इम्तियाज अली सारख्या दिग्दर्शकाने. अभयने सांगितले, 'इम्तियाज सरांनी मला एक खूप महत्त्वाचं सांगितलं की इंडस्ट्रीत स्वीकारले जाणं हेच महत्त्वाचं आहे.'

अभय वर्माच्या यशाचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्या कामावरचं प्रेम, चिकाटी आणि संघर्ष. आज तो एक प्रमुख कलाकार म्हणून ओळखला जातो, परंतु त्याच्या यशात केवळ यशाचा भाग नाही, तर त्याच्या कठोर मेहनतीचा खूप मोठा वाटा आहे. 'मुंज्या' चित्रपटाने केवळ अभय वर्माचं नशीब बदललं नाही, तर त्याला बॉलिवूड इंडस्ट्रीत एक नवीन ओळख बनवायला मदत केली. 
अभय वर्मा कडून आपल्याला हे शिकायला मिळते की संघर्ष आणि परिश्रमानेच आपली ओळख बनवता येते. त्याचं हे यश अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं.