भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी दुहेरी आणि तिहेरी भूमिका साकारल्या आहेत. काही अभिनेत्यांनी बाप आणि मुलाच्या भूमिका केल्या आहेत, तर काहींनी त्यांच्या सहकलाकारांच्या आई आणि प्रेयसीच्या भूमिकाही निभावल्या आहेत. असचं एक उदाहरण म्हणजे दोन महान सुपरस्टार्सने एकाच चित्रपटात नातवंड आणि दुसऱ्या चित्रपटात प्रियकराची भूमिका केली. हे दोन्ही कलाकार आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या कलेने आणि योगदानाने भारतीय चित्रपटसृष्टीला अपार समृद्धी दिली आहे.
'या' सुपरस्टार्समधील धक्कादायक अंतर
सुपरस्टार एनटी रामाराव आणि बॉलिवूडची 'चांदनी' श्रीदेवी, हे दोन दिवंगत अभिनेता-अभिनेत्री भारतीय चित्रपटसृष्टीचे भाग आहेत. 1972 मध्ये आलेल्या तेलुगू चित्रपट 'बडी पंथुलु' मध्ये 9 वर्षांच्या श्रीदेवीने एनटी रामाराव यांच्या नातीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात एनटी रामाराव 56 वर्षांच्या आजोबांच्या भूमिकेत होते आणि त्यांच्या वयातील फरक साधारण 40 वर्षांचा होता. या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले.
एकत्र काम करणारे सुपरस्टार्स
श्रीदेवी आणि एनटी रामाराव यांनी एकत्र 12 चित्रपट केले होते. त्यात 'बडी पंथुलु' चित्रपटाच्या 7 वर्षानंतर 1979 मध्ये आलेल्या तेलगू चित्रपट 'वेतागडू'मध्ये श्रीदेवीने एनटी रामाराव यांच्या नायिकेची भूमिका साकारली. हा चित्रपट एक ॲक्शन थ्रिलर होता, ज्याचे दिग्दर्शन के राघवेंद्र राव यांनी केले. एनटी रामाराव यांचे 1996 मध्ये 72 व्या वर्षी निधन झाले. तर श्रीदेवी यांचे 2018 मध्ये 54 व्या वर्षी निधन झाले. या दोघांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. परंतु त्यांचे योगदान आणि कलेचे ठसे अजूनही प्रेक्षकांच्या ह्रदयात ताजे आहेत.
2024 मध्ये पुन्हा एकत्र येणारी पिढी
2024 मध्ये, एनटी रामाराव यांचा नातू ज्युनियर एनटीआर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर 'देवरा पार्ट 1' चित्रपटात एकत्र काम करताना दिसले. हा चित्रपट जान्हवी कपूरसाठी महत्त्वाचा ठरला कारण जान्हवीचा हा टॉलिवूडमधील डेब्यू चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि दोन्ही स्टार किड्सचा अभिनय आणि स्टाइलला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/khushi-kapoors-cute-ugly...
या चित्रपटामुळे दोन भिन्न पिढ्यांतील सुपरस्टार्स एका धाग्याने जोडले गेले. ज्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील कुटुंबीय नात्यांचा आणि सिनेमाच्या वारशाचा नवा पिढीपर आधारित अध्याय निर्माण झाला.
संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत हे एक अभूतपूर्व उदाहरण आहे. ज्यामध्ये पिढ्यांच्या अंतरावरून येणारे अद्भुत कनेक्शन आणि अभिनयाच्या समृद्ध कलेचे अद्वितीय मिश्रण आहे.