बीग बींच्या नातीचे संस्कार पाहून चाहते भारावले; पाहा व्हिडिओ

बीग बींची नात आराध्याकडून शिका देवीची खास आरती

Updated: Oct 13, 2021, 02:32 PM IST
बीग बींच्या नातीचे संस्कार पाहून चाहते भारावले; पाहा व्हिडिओ title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सौंदर्यासाठीही ओळखली जाते. त्याचबरोबर ऐश्वर्याची 9 वर्षांची मुलगी आराध्या देखील चर्चेत येण्यासाठी कोणापेक्षाही कमी नाही. चाहत्यांना अनेकदा आराध्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आवडतात. असाच एक आराध्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती सिया रामचे भजन गाताना दिसत आहे. आराध्या बच्चनच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांना या व्हिडिओमधील आराध्याचा क्यूट अंदाज आवडला आहे. 

व्हिडिओमध्ये आराध्याने गुलाबी  रंगाचा ड्रेस घातला आहे. आराध्याची देवावर असलेली श्रद्धा  पाहून चाहते भारावले आहेत. बच्चन कुटुंबात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बच्चन कुटुंबाची श्रद्धा देवावर आहे. तेच संस्कार बीग बींची  नात आराध्यावर देखील दिसून येत आहेत. आराध्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aaradhya bachchan (@aaradhyabachchan_arb)

अशा स्थितीत आराध्याला दिलेले संस्कार पाहून चाहते स्वतःला आनंद व्यक्त करण्यापासून रोखू शकत नाहीत. सांगायचं झालं तर आराध्या, ऐश्वर्या आणि अभिषेकला नुकताचं विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी देखील ऐश्वर्या आराध्याचा हात पकडून चालत होती. ऐश्वर्या कधीही आराध्याला एकटं सोडत  नाही.

गर्दीत आपण सोबत असल्याची भावना 
अनेकदा अनोळख्या ठिकाणी मुलं घाबरतात किंवा गर्दीतील लोकांना बघून मुलं लाजतात. अशावेळी आपण पालक म्हणून त्यांच्यासोबत आहोत ही भावना मुलांना देण्यासाठी ऐश्वर्या कायमच आराध्याचा हात आपल्या हातात धरून राहते. 

असं म्हणतात की, एका रेड कार्पेट सोहळ्यात ऐश्वर्यासोबत आराध्या देखील गेली होती. ऐश्वर्याची एन्ट्री होताच गर्दी झाली तेव्हा आराध्या खूप गोंधळली. माणसांची गर्दी, कॅमेऱ्याची लाईट आणि लोकांचा गोंधळ यामुळे आराध्या गोंधळली आणि इकडे तिकडे पळू लागली. याच अनुभवानंतर ऐश्वर्या कायमच आराध्याचा हात धरून असते.