ऐश्वर्याच्या लेकीवर चाहते फिदा; फोटोवर कमेंट करत युजर्स म्हणाले, 'पहिल्यांदाच आराध्याचा असा लूक'...

 ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चन सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

Updated: Jun 4, 2022, 06:49 PM IST
ऐश्वर्याच्या लेकीवर चाहते फिदा; फोटोवर कमेंट करत युजर्स म्हणाले, 'पहिल्यांदाच आराध्याचा असा लूक'... title=

मुंबई : ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चन सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. आराध्या बच्चनची कोणतीही पोस्ट येताच सोशल मीडियावर खळबळ उडवून देते. आराध्याची लोकप्रियता इतकी आहे की लोकांना तिची आई ऐश्वर्या रायपेक्षा तिचे व्हिडिओ आणि फोटो जास्त आवडतात. आराध्यावर प्रेमाचा वर्षाव होतो. अशा परिस्थितीत आराध्या बच्चनची एक नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जी लोकांना खूप आवडते. या नवीन पोस्टमध्ये आराध्या बच्चनचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तिचा पूर्णपणे नवीन आणि वेगळा अवतार पाहायला मिळत आहे.

आराध्याचा हा नवा फोटो ऐश्वर्या रायच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. मात्र, कमेंट सेक्शन पाहता हा फोटो जुना असल्याचं कळतंय. जो आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. फोटोमध्ये आराध्या आई ऐश्वर्यासोबत दिसत आहे. ऐश्वर्या राय तिच्या मागे आराध्याला धरून उभी आहे. यादरम्यान ऐश्वर्याही नटून-थटून उभी आहे. पण हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या नजरा ऐश्वर्याकडे नसून आराध्याकडे लागल्या होत्या. आराध्याचा असा अवतार यापूर्वी कधीही पाहिला नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या पोस्टला 12 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याचबरोबर बहुतेक लोकं हार्ट आणि फायर इमोजीसह कमेंट शेअर करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, "ज्युनियर ऐश्वर्या खूपच क्यूट दिसते", तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, "आराध्याचे मोठे डोळे खूप सुंदर आहेत.". तर अजून एका यूजर लिहिलं आहे की, "मी पहिल्यांदाच आराध्याचा असा अवतार पाहिला आहे".