'आणि काय हवं?' म्हणतं प्रिया-उमेशने शेअर केली Good News

सोशल मीडियावरून दिली गोड बातमी 

Updated: Mar 11, 2021, 11:20 AM IST
'आणि काय हवं?' म्हणतं प्रिया-उमेशने शेअर केली Good News  title=

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट(Priya Bapat) . प्रिया-उमेश कायमच आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना आनंद देत असतात. ही जोडी रिल लाईफसोबतच रिअल लाईफमध्येही खास आहे. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कायमच चर्चेत असते. (Priya Bapat तसेच सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असता. 

आता प्रिया बापटने एक Good News शेअर केली आहे. प्रिया- उमेश सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ही सुपरहिट जोडी 'आणि काय हवं?' या वेब सीरिजमध्ये रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. या वेब सीरिजचं तिसरं पर्व येत आहे. याची घोषणा प्रियाने इंस्टाग्रामवरून नुकतीच केली आहे. वरूण नार्वेकर या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपण ‘आणि काय हवं?…3’च्या चित्रिकरणाचा शुभारंभ केल्याची पोस्ट टीमच्या फोटोसहित शे्अर केली आहे. या फोटोमध्ये प्रिया बापटसह, उमेश कामत, दिग्दर्शक वरूण नार्वेकर, रणजीत गुगळे, अनिश जोग आणि अमोल साळुंखे हेसुद्धा आहेत्त. प्रियाच्या या पोस्टवर चाहत्यांसह सर्वच कलाकार मडळींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

'आणि काय हवं?'

 'आणि काय हवं?' या वेब सीरिजमधून उमेश कामतने वेब विश्वात पदार्पण केलंय. प्रियाची ही दुसरी वेब सीरिज आहे. प्रियाने या अगोदर 'सिटी ऑफ ड्रिम्स'मध्ये काम केलं आहे. 'आणि काय हवं?' या सीरीजमध्ये प्रियाने 'जुई' तर उमेशने 'साकेत' ही व्यक्तीरेखा साकारली आहे. 

नुकतंच लग्न झालेलं शहरी कपल्समध्ये होणारा संवाद यामधून मांडला आहे. नवीन लग्न झाल्यावर कपल्सच्या आयुष्यात होणाऱ्या गमतीजमती यामध्ये पाहायला मिळाल्या. या वेब सीरिजच्या निमित्ताने ही लोकप्रिय जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.