आमिर खानचा मुलगा जुनैद खान बनणार ट्रान्सवुमन; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

फिल्म इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. सध्या आमिरचा मुलगा जुनैद त्याच्या पदार्पणामुळे चर्चेत आला आहे.

Updated: Nov 8, 2023, 04:49 PM IST
आमिर खानचा मुलगा जुनैद खान बनणार ट्रान्सवुमन; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?  title=

मुंबई : फिल्म इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. सध्या आमिरचा मुलगा जुनैद त्याच्या पदार्पणामुळे चर्चेत आला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, जुनैद खान YRF च्या 'महाराज' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री करणार आहे. जुनैद खान अनेक दिवसांपासून थिएटर करत आहे. आता बातमी समोर येत आहे की, आमिर खानचा लाडका एका नाटकात ट्रान्सवुमनची भूमिका साकारताना दिसणार आहे. जुनैद खानचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

पिंकविलामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जुनैद खान त्याच्या आगामी 'स्ट्रिक्टली अनकन्व्हेंशनल' या नाटकात ट्रान्सवुमनची भूमिका साकारणार आहे. या नाटकाचा पहिला शो १५ नोव्हेंबरला पृथ्वी थिएटर, मुंबई येथे दाखवण्यात येणार आहे. पिंकविला न्यूजच्या वृत्तानुसार, जुनैद खान या नाटकात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या ट्रान्सवुमन लूकसाठी जुनैद खान महिलांच्या पोशाखात दिसणार आहे. यासाठी स्टारकिड लांब केसांचा विग घालणार आहे. मात्र, जुनैद खानच्या दुसऱ्या पात्राबाबत अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, आमिर खानचा मुलगा जुनैद खान यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या 'महाराज' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री सई पल्लवी दिसणार आहे. या लव्हस्टोरीचं शूटिंग सध्या जोरात सुरू आहे. जुनैदच्या बॉलिवूड डेब्यूबाबत आमिर खानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो जवळपास 15 ऑडिशनमध्ये नापास झाला होता. त्यानंतर त्याला हा चित्रपट मिळाला. यासोबतच आमिरने असंही म्हटलं होतं की, त्याला आपल्या मुलाला लॉन्च करण्याची इच्छा कधीच नव्हती कारण त्याला विश्वास आहे की, केवळ तोच कलाकार इंडस्ट्रीत टिकू शकतो, ज्याच्याकडे टॅलेंट आहे.

तर दुसरीकडे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याची मुलगी आयरा खानच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अलीकडेच आयराच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. तेव्हापासून आयरा आणि तिचा भावी पती नुपूर शिखरे चर्चेत आहेत. त्याचबरोबर, आता आयरा आणि नुपूरचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत.