... ही आहे आमिरच्या करिअरमधली सर्वात कठिण भूमिका!

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी घेत असलेली मेहनत अनेकदा वेगवेगळ्या माध्यमांतून प्रेक्षकांपर्यंत पोहचते... पण, आमिरलाही एखादी भूमिका कठिण भासू शकते यावर कदाचित त्याच्या चाहत्यांचा विश्वास बसणार नाही. 

Updated: Sep 28, 2017, 05:48 PM IST
... ही आहे आमिरच्या करिअरमधली सर्वात कठिण भूमिका! title=

मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी घेत असलेली मेहनत अनेकदा वेगवेगळ्या माध्यमांतून प्रेक्षकांपर्यंत पोहचते... पण, आमिरलाही एखादी भूमिका कठिण भासू शकते यावर कदाचित त्याच्या चाहत्यांचा विश्वास बसणार नाही. 

आगमी 'सिक्रेट सुपरस्टार'मध्ये असणारी भूमिका ही आपल्या आत्तापर्यंतच्या करिअरमधली सर्वात कठिण भूमिकांपैंकी एक असल्याचं आमिरनं सोशल मीडियावर म्हटलंय. 

आमिरनं ही भूमिका कशी अस्तित्वात आली हे सांगणारा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय... यासोबत त्यानं म्हटलंय. 'one of my toughest roles'.

'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमात आमिर एका म्युझिक कम्पोजर शक्ती कुमारच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातला आमिरचा अतरंगी लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. 

दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आमिरचा स्पेशल अपीअरन्स आहे. त्याच्यासोबत दंगल गर्ल जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे.