'आई कुठे काय करते' मधील 'हा' लोकप्रिय कलाकार आता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत

Aai Kuthe Kay Karte Fame Actor in Navri Mile Hitler la Serial : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील हा लोकप्रिय अभिनेता आता दिसणार ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 26, 2024, 01:18 PM IST
'आई कुठे काय करते' मधील 'हा' लोकप्रिय कलाकार आता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत title=
(Photo Credit : Social Media)

Aai Kuthe Kay Karte Fame Actor in Navri Mile Hitler la Serial : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'आई कुठे काय करते' या मालिकेत रोज काही ना काही वेगळं होत असल्याचे आपण पाहतो. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. तर त्याशिवाय काही कलाकार ही मालिका सोडताना दिसत आहेत. अशात या मालिकेतील एक कलाकार आता ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत दिसणार आहे. 

'आई कुठे काय करते' या मालिकेत इशाच्या पहिल्या बॉयफ्रेंडची म्हणजेच साहिलची भूमिका साकारणारा अभिनेता अद्वैत कडणेचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्या दोघांच्या लव्ह स्टोरीचा जो ट्रॅक दाखवण्यात आला तो प्रेक्षकांना प्रचंड आवडला. ही भूमिका मर्यादित काळासाठी होती. परंतु, त्यातूनही त्याने लोकप्रियता मिळवली. आता अद्वैत हा ‘झी मराठी’ वरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेविषयी स्वत: अद्वैतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. त्यात त्यानं मालिकेचा एक फोटो शेअर केला आहे. मालिकेत अद्वैत हा विक्रांत या भूमिकेत दिसणार आहे. तर त्याची ही भूमिका लीलाची बहीण असलेल्या रेवतीच्या बॉयफ्रेंडची असणार आहे. तर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत या मालिकेत त्याची महत्त्वाची भूमिका आहे. 

Aai Kuthe Kay Karte Fame Actor in Navri Mile Hitler la Serial know who is he

आता अद्वैतला साहिलनंतर विक्रांतच्या भूमिकेत प्रेक्षकांकडून किती प्रेम मिळणार हे पाहण्यासाठी सगळे आतुर आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याची या मालिकेतील भूमिका कशी वेगळी असेल हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. अद्वैतच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याआधी ‘जाऊ नको दूर बाबा !’, ‘अग्निहोत्र 2’, ‘फुलपाखरु’ या मालिकांमध्ये देखील दिसला. तरी ‘अग्निहोत्र 2’ मधील त्याच्या फंकी लूकसाठी देखील तो ओळखला जात होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : लग्नाला 13 वर्ष झाली तरी बाळ नाही? प्रेग्नंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटचे सडेतोड उत्तर

अद्वैतविषयी बोलायचे झाले तर त्याचे इन्स्टाग्रामवर 42.4K फॉलोवर्स आहेत. अद्वैत हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अद्वैत हा फिटनेस एन्थोजियास आहे. तो अनेकदा त्याचे जीममधील आणि त्याच्या रनिंगचे फोटो आणि माहिती शेअर करताना दिसतो.