'आई कुठे काय करते' मालिकेतील लोकप्रिय पात्र म्हणजे अरुंधती. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर मालिकेत आईची भूमिका साकारत आहे. या मालिकेतून मधुराणीने प्रेक्षकांचं मन जिंकल आहे. मधुराणी सोशल मीडियावर ऍक्टिव असून ती आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
अशीच एक खास आणि आनंदाची गोष्ट मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ते म्हणजे मधुराणीने मुंबईत आपल्या हक्काचं घर घेतलं आहे. मधुराणीने मुंबईतील विलेपार्ले येथे स्वतःच घर घेतलं आहे. इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
मधुराणीने आपल्या मुलीसोबत हा व्हिडीओ तयार केला आहे. मधुराणीने हे नवं घर मुलीला दाखवलं आहे. मुंबईतील विलेपार्ले येथे हे नवं घर घेतलं असून घराचा संपूर्ण व्हिडीओ यामध्ये आहे. हॉल, किचन, बेडरुम असलेला हा व्हिडीओ आहे.
मुंबईत आपलं स्वतः चं घर असावं, आणि तेही विलेपार्ले पूर्व इथेच. हे अनेक वर्षं हृदयाशी जपून ठेवलेलं स्वप्न... ते स्वप्न पूर्ण होणं आणि लेकीच्या साथीनं त्या स्वप्नपूर्तीचा आंनद द्विगुणित होणं हे सगळंच अनमोल आहे.
आज मन कृतज्ञतेने भरून आलंय. आई वडिलांचे आणि सर्व थोरा मोठ्यांचे कृपाशीर्वाद, गुरुकृपा, आणि असंख्य शुभचिंतकांच्या सदिच्छा निव्वळ ह्यामुळेच हे स्वप्न साकारलंय....!!!
सविनय व सादर आभार
अरुंधती आता मुंबईकर झाली आहे. पुण्यात राहणाऱ्या अरुंधतीने मुंबईत घर घेतलं आहे. विलेपार्ले पूर्व येथे हे घर आहे. अरुंधतीच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एवढंच नव्हे तर अरुंधतीचे चाहते देखील खूष झाले आहेत.