Ananya Panday : न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालानंतर चित्रपटसृष्टीतून दररोज लैंगिक छळाची प्रकरणे समोर येत आहेत. अनेक अभिनेत्रींनी स्वत: पुढे येऊन याचा खुलासा केला आहे. तर काहींनी यावर मौन बाळगले आहे. अशा परिस्थितीत केरळच्या मल्याळम फिल्म इंडस्ट्रीबाबत नुकत्याच आलेल्या हेमा समितीच्या अहवालानंतर मल्याळम, तामिळ आणि तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी लैंगिक छळाचा खुलासा केला आहे. ज्यावर हिंदी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आपली मते मांडली आहेत.
आता या यादीत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिचे देखील नाव जोडले गेले आहे. अनन्या पांडेने मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील महिलांच्या ऐक्याचे कौतुक केले आहे.
काय म्हणाली अनन्या पांडे?
14 सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथे आयोजित इंडिया टुडे माइंडरॉक्स यूथ समिट 2024 मध्ये अनन्याने तिच्या स्पष्ट वक्तव्याने सर्वांची मने जिंकली. ती म्हणाली की, प्रत्येक उद्योगासाठी हेमा समिती सारखी समिती असणे खूप महत्वाचे आहे. जिथे महिला एकत्र येतात आणि असे काहीतरी सुरू करतात. असे केल्याने नक्कीच फरक पडला आहे असे मला वाटते. तुम्हाला माहीत आहे आणि आता लोक किमान या समस्येबद्दल बोलत आहेत हे तुम्ही पाहू शकता. मात्र, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. अजूनही मोठ्या लढाया करायच्या आहेत. असं अनन्या पांडे म्हणाली.
महिलांची सुरक्षा आवश्यक आहे
पुढे अनन्या पांडे म्हणली की, न्यायमूर्ती हेमा समिती सारख्या अनेक प्रॉडक्शन हाऊसने महिलांच्या सुरक्षेसाठी काम सुरू केलं आहे. 'आज आमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये काही हेल्पलाइन नंबर आहेत जे महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करतात. मला वाटते की हे खूप महत्वाचे आहे. आमच्या कॉलशीटमध्येही हेल्पलाईन क्रमांक आहेत. ज्यावर तुम्ही कॉल करून तुमची तक्रार करू शकता.
'महिलांची सुरक्षा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मी नेहमी याबद्दल बोलते आणि ते योग्यरित्या करणे महत्वाचे आहे. हे फक्त बोलण्यापुरते नाही तर यासाठी तुम्हाला काहीतरी करावे लागेल. असं अनन्या म्हणाली.