Queen Cleopatra : काल म्हणजेच 10 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'क्वीन क्लियोपेट्रा' ही डॉक्यो सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये इजिप्तच्या राणीची कहाणी दाखवण्यात आली आहे. पण ही सीरिज प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात आली होती. या सीरिजमध्ये ब्रिटीश अभिनेत्री अॅडेल जेम्सने मुख्य भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये एका ब्लॅक वूमननं इजिप्तची क्वीन क्लियोपेट्राची भूमिका साकारल्यानं इजिप्त नाराज आहे. गेल्या महिन्यात या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून हा वाद सुरु झाला होता. ट्रेलर पाहिल्यानंतर इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातन वस्तू मंत्रालयाने एक पत्रक जारी केलं आहे. त्या पत्रकामध्ये त्यांनी म्हटले की क्वीन क्लियोपेट्राची त्वचा ही लाईट स्कीन होती आणि त्यांचे फीचर हे ग्रीक होते. त्यानंतर इजिप्तमधील सरकारी मालकीच्या टेलिव्हिजन वाहिनीनं त्याला टक्कर देण्यासाठी स्वतःची उच्च श्रेणीची मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
इजिप्तचे वकील मोहम्मद अल सेमारी यांनी नेटफ्लिक्स विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचं कारण म्हणजे या सीरिजमध्ये क्वीन क्लियोपेट्राला ब्लॅक आफ्रिकीच्या रुपात दाखवले आहे. त्यांच्या मते या सीरिजच्या माध्यमातून इजिप्तच्या लोकांची ओळख संपवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इजिप्तच्या सरकारी मालकीच्या टेलिव्हिजन या सीरिजवर एक डॉक्युमेंट्री बनवणार असून ती रीसर्च करून बनवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : The Kerala Story फेम अदा शर्मा वाढदिवसाच्या दिवशी शंकराच्या मंदिरात; 'शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral
इजिप्तच्या सरकारने 30 एप्रिल रोजी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, 'क्वीन क्लियोपेट्राच्या पुतळ्यांवरून हे स्पष्ट होतं की ती गोरी होती आणि तिचे ग्रीक फीचर होते. तिचे नाक टोकेरी होते आणि तिचे ओढ हे छोटे होते. तर या शोचे निर्माते म्हणतात की कोणत्याही गोष्टी स्पष्ट नाहीत. कारण काही लोक बोलतात की क्वीन क्लियोपेट्राची आई ही आफ्रिकन असण्याची शक्यता आहे. तर आपल्याला आफ्रिकनी राण्या कधी पाहायला मिळत नाही. हेच माझ्यासाठी, माझ्यामुलीसाठी आणि माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, असे जडा पिंकेट स्मिथ यांनी सांगितले. जडा पिंकेट स्मिथ यांनीच 'आफ्रिकन क्वीन्स' ची निर्मिती केली होती.
दरम्यान, आजवर क्वीन क्लियोपेट्राची भूमिका वेगवेगळ्या कलाकारांनी साकारली आहे. 1963 मध्ये अभिनेत्री एलिझाबेथ टेलरनं ही भूमिका साकारली होती. त्यानंतर एंजेलिना जोली, लेडी गागा आणि गॅल गॅडॉटपर्यंत अनेक अभिनेत्रींनी क्वीन क्लियोपेट्राची भूमिका साकारली आहे.